Tuesday, 6 May 2025
  • Download App
    भारत हिंदूराष्ट्र आधीही होते, आताही आहे, पुढेही राहणार, वेगळे स्थापण्याची गरज नाही; संघाचे सरकार्यवाह होसबळे यांचे मत|India was a Hindu Rashtra before, it is now, it will continue to be, there is no need to establish it separately; The opinion of Sangh Sarkaryawah Hosbale

    भारत हिंदूराष्ट्र आधीही होते, आताही आहे, पुढेही राहणार, वेगळे स्थापण्याची गरज नाही; संघाचे सरकार्यवाह होसबळे यांचे मत

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : केंद्रात सरकार आल्यानंतर भाजपकडून आक्रमकपणे हिंदुत्ववादी भूमिका घेणे सुरू झाले. मागील काही वर्षात संघ परिवारातील काही संघटना, भाजपचे नेते आणि इतर उजव्या संघटनांकडून हिंदू राष्ट्राची मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारतात हिंदू राष्ट्र स्थापन करण्याची आवश्यकता नाही. भारत हे हिंदू राष्ट्रच आहे, असे विधान त्यांनी केले.India was a Hindu Rashtra before, it is now, it will continue to be, there is no need to establish it separately; The opinion of Sangh Sarkaryawah Hosbale

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक गुजरातमधील भूजमध्ये पार पडली. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी भूमिका स्पष्ट केली. भारत हिंदू राष्ट्र केव्हा बनणार या पत्रकारांच्या प्रश्नाचा उत्तर देताना होसबळे यांनी भारत हिंदू राष्ट्र आधीही होता, आजही आहे आणि नेहमीच राहणार असे मत व्यक्त केले. यावेळी होसबळे यांनी आद्य सरसंघचालक डॉ हेडगेवार यांच्या एका ऐतिहासिक वक्तव्याचा उदाहरणही दिले. हेडगेवार म्हणाले होते मी हिंदू आहे असे म्हणणारा एकही व्यक्ती जोवर या भूमीवर आहे, तोवर भारत हिंदू राष्ट्र राहणार.



    यावेळी आपल्या उत्तरात आणखी स्पष्टता आणण्यासाठी होसबळे यांनी संविधानानुसार असलेली राज्यपद्धती म्हणजेच स्टेट सिस्टम आणि राष्ट्र यांच्यामध्ये काय फरक आहे, हे ही खुलासेवार सांगितले. भारतावर जेव्हा इंग्रजांचे राज्य होते, तेव्हा ते ब्रिटिश राज होते. मात्र तेव्हाही राष्ट्र म्हणून भारत हिंदू राष्ट्रच होता असे होसबळे म्हणाले. आपला देश, समाज, संस्कृती, धर्म यासाठी काहीतरी चांगलं करण्याची भावना असणे हेच हिंदुत्व आहे आणि याच हिंदुत्वाची जाणीव व्हावी यासाठी संघ कार्य करत आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्राची स्थापना करण्याची गरज नसून भारत हिंदू राष्ट्रच आहे असा पुनरुच्चार होसबळे यांनी केला.

    हिंदुस्थान हिंदू राष्ट्र : सरसंघचालक

    हिंदुस्थान हिंदू राष्ट्र आहे आणि हे सत्य आहे आणि आरएसएस हे करणार. वैचारिकदृष्ट्या सर्व भारतीय हिंदू आहेत, काही लोकांना समजले आहे आणि काही लोक समजल्यानंतरही अनभिज्ञ आहेत, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. तर हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र आहे, हे सत्य आहे, आरएसएस हे नक्की करेल, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे, यात काही आक्षेप नाही पण सर्व भारतीयांची काळजी करा, वैचारिकदृष्ट्या सर्व भारतीय हिंदू आहेत, असे मोहन भागवत म्हणाले होते.

    India was a Hindu Rashtra before, it is now, it will continue to be, there is no need to establish it separately; The opinion of Sangh Sarkaryawah Hosbale

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री फडणवीस

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!

    “नरकातला स्वर्ग” पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत शरद पवारांच्या घरी; स्वतः पवारांनीच दिली माहिती!!