• Download App
    अभिमानास्पद : देशभरातील ‘रोड नेटर्वक’बाबतीत भारताने चीनला मागे टाकत जगात मिळवले द्वितीय स्थान India surpasses China to become second in the world in Road Network Union Minister Nitin Gadkari

    अभिमानास्पद : देशभरातील ‘रोड नेटर्वक’बाबतीत भारताने चीनला मागे टाकत जगात मिळवले द्वितीय स्थान

    केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती;  रस्त्यांच्या जाळ्यांच्या बाबतीत अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक

    विशेष प्रतिनिधी

     नवी दिल्ली  :  भारताने 2014 पासून 1.45 लाख किमी रस्त्याचे जाळे जोडून चीनला मागे टाकले आहे आणि रस्त्याच्या जाळ्याच्या बाबतीत जगात दुसरे स्थान मिळवले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. रस्त्यांच्या जाळ्याच्या बाबतीत अमेरिकेनंतर भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारताने 2014 पासून चीनला मागे टाकत 1.45 लाख किलोमीटर रस्त्यांचे जाळे जोडून जगात दुसरे स्थान मिळवले आहे. India surpasses China to become second in the world in Road Network Union Minister Nitin Gadkari

    केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषद घेऊन रस्ते पायाभूत क्षेत्रातील ही कामगिरी देशाला सांगितली. ते म्हणाले की, रस्त्यांच्या जाळ्याच्या बाबतीत भारत आता अमेरिकेनंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक मंत्री असताना मंत्रालयाने केलेल्या कामगिरीबद्दल सांगितले. यादरम्यान, ते म्हणाले की, गेल्या ९ वर्षांत भारताने अनेक ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे जोडले आहेत आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) देशातील सर्वात लांब दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचे बांधकाम जवळपास पूर्ण केले आहे.

    नितीन गडकरी म्हणाले की, 9 वर्षांपूर्वी भारताचे रस्त्यांचे जाळे 91,287 किलोमीटर होते. एप्रिल 2019 पासून, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरात 30,000 किलोमीटरहून अधिक राष्ट्रीय महामार्ग बांधले आहेत, ज्यात अनेक प्रमुख द्रुतगती मार्गांचा समावेश आहे.

    NHAI ने देशातील महामार्ग आणि द्रुतगती मार्गांच्या बांधकामादरम्यान 7 जागतिक विक्रम केले. या वर्षी मे महिन्यात NHAI ने १०० किलोमीटर लांबीचा नवीन एक्सप्रेसवे १०० तासांत पूर्ण केला. ऑगस्ट 2022 मध्ये, NHAI ने NH-53 वर 75 किमी सलग सिंगल बिटुमिनस काँक्रीट रस्ता 105 तास आणि 33 मिनिटांच्या विक्रमी वेळेत यशस्वीरित्या बांधला आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले.

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या कार्यकाळात रस्ते आणि महामार्गावरून येणारा महसूल वाढल्याचेही सांगितले. त्यांनी सांगितले की नऊ वर्षांपूर्वी टोल वसुली 4,770 कोटी रुपयांवरून 41,342 कोटी रुपये झाली आहे.

    India surpasses China to become second in the world in Road Network Union Minister Nitin Gadkari

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!