वृत्तसंस्था
मुंबई : भारताने दुसरा कसोटी सामना जिंकून न्यूझीलंडवर विजय मिळविला असून मालिकाही आज खिशात टाकली आहे. दोन कसोटी सामन्यापैकी कानपूर कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. मात्र भारताने मुंबई कसोटी सामना जिंकला आहे. India pocketed the series along with the Tests; India beat New Zealand by 372 runs ; India wins their 14th consecutive series
भारताने केवळ ४३ मिनिटांत न्यूझीलंडचा डाव गुंडाळला आणि कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तिसऱ्या दिवसअखेर भारतानं ५ विकेट्स घेत न्यूझीलंडला पराभवाच्या दिशेनं ढकलले होते. चौथ्या दिवसात जयंत यादवने न्यूझीलंडचा डाव गुंडाळला. भारताचा हा घरच्या मैदानावरील १४वा कसोटी मालिका विजय ठरला.
भारताच्या पहिल्या डावातील ३२५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावांवर गडगडला. भारतानं फॉलो ऑन न देता पुन्हा फलंदाजी करताना ७ बाद २७६ धावांवर दुसरा डाव घोषित केला. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक राहिली. टॉम लॅथम ( ६), विल यंग ( २०) व रॉस टेलर ( ६) यांना आर अश्विननं माघारी पाठवून किवींना मोठे धक्के दिले. हेन्री निकोल्स व डॅरील मिचेल यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगला सामना केला. मिचेलनं वैयक्तिक अर्धशतकासह निकोल्सह ७३ धावांची भागीदारी केली. परंतु अक्षर पटेलनं ही जोडी तोडली. डॅरील मिचेलला ६० धावांवर माघारी जावं लागलं. त्यानंतर आलेल्या टॉम ब्लंडलनं घाई केली आणि त्यालाही शून्यवर धावबाद होऊन माघारी जावं लागलं.
चौथ्या दिवशी जयंत यादवने पहिली विकेट राचिन रविंद्रनं घेतली. राचिन १८ धावांवर चेतेश्वर पुजाराच्या हाती झेलबाद झाला. त्यापाठोपाठा कायले जेमिन्सन ( ०) व टीम साऊदी ( ०) यांनाही जयंतनं विकेट घेत न्यूझीलंडला मोठे धक्के दिले. विलियम सोमरविले ( १) यादवच्या गोलंदाजीवर फसला. हेन्री निकोल्स नॉन स्ट्रायकर एंडला विकेट्स पडताना पाहत होता. अश्विननं त्याची विकेट घेत भारताचा विजय पक्का केला. न्यूझीलंडचा डाव १६७ धावांवर गुंडाळून भारतानं ३७२ धावांनी विजय मिळवला. अश्विन व जयंत यादव यांनी प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या.
India pocketed the series along with the Tests; India beat New Zealand by 372 runs ; India wins their 14th consecutive series
महत्त्वाच्या बातम्या
- ऑनर किलिंगच्या घटनेनं औरंगाबाद हादरलं : अल्पवयीन भावानेच बहिणीची केली निर्घृण हत्या, हत्या केल्यावर सेल्फीही काढली
- उत्पादकांची द्राक्षे गोड व्हावीत, विशेष मदतीचे पॅकेज द्यावे, कर्जमाफी करावी; राजू शेट्टी यांची मागणी
- MODI-PUTIN MEET : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आज भारतात ! होणार एके-203 रायफल्स-डिफेन्स सिस्टीमचा सौदा ;०६ महिन्यात पुतीन यांचा पहिला दौरा
- वसीम रिझवींनी इस्लाम सोडून आजपासून स्वीकारला हिंदू धर्म, यति नरसिंहानंद यांनी दिला सनातन धर्मात प्रवेश
- प्रियंका चतुर्वेदी यांच्यापाठोपाठ शशी थरुर यांचाही संसद टीव्हीचा राजीनामा