• Download App
    Devendra Fadnavis 'प्रो रेसलिंग प्रकारात भारताला 'रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियामुळे स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध'

    ‘प्रो रेसलिंग प्रकारात भारताला ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियामुळे स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध’

    Devendra Fadnavis

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान, जाणून घ्या आणखी काय म्हणाले?

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी एनएससीआय डोम, वरळी, मुंबई येथे ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनिया (WXM)’ कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

    याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनिया’ (WXM) च्या आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. भारताला प्रो रेसलिंगसाठी स्वतःचे व्यासपीठ ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनिया’मुळे उपलब्ध झाले आहे. भारतासाठी हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जगाला दिलेले ठोस उत्तर आहे की भारत सर्वकाही करू शकतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.



    ते पुढे म्हणाले की, खेळ आणि त्याच्याशी संबंधित मनोरंजन हे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात सर्वाधिक लोकप्रिय असणारे माध्यम आहे. त्यामुळेच ‘वेव्ह्ज 2025’मध्ये ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनिया’चा समावेश करण्यात आला आहे.

    या वेळी भारतीय रेसलर्सनी दाखवलेले प्रावीण्य जागतिक स्तरावरील होते, यावरही त्यांनी विशेष भर दिला आणि त्यांच्या कामगिरीचे मनापासून कौतुक केले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियाचे आयोजक व इतर मान्यवर उपस्थित होते.

    India has its own platform in the pro wrestling category due to Wrestling Extreme Mania -Devendra Fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !