• Download App
    300 आकड्याचे ध्येय तोकडे, प्रचार सगळा नकारात्मक; ठाकरे + पवार + गांधींची नुसतीच आदळआपट!!INDI alliance targets only 290 - 300 seats infront of Modi's ab ki baar 400 paar...!!

    300 आकड्याचे ध्येय तोकडे, प्रचार सगळा नकारात्मक; ठाकरे + पवार + गांधींची नुसतीच आदळआपट!!

    नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीसाठी अब की बार 400 पार ही घोषणा देऊन झाल्यानंतर काँग्रेस प्रणित “इंडिया” आघाडीतल्या नेत्यांनी सुरुवातीला आपला पर्यायी आकडा सांगायलाच नकार दिला होता, पण आता जो आकडा त्यांनी समोर आणला आहे, तो पाहिल्यावर वर दिलेले शीर्षक सुचले आहे. ध्येय तोकडे, प्रचार नकारात्मक ठाकरे + पवार + गांधींची नुसतीच आदळआपट!!, असे म्हणायची वेळ त्या आकड्यामुळे आली आहे. INDI alliance targets only 290 – 300 seats infront of Modi’s ab ki baar 400 paar…!!

    महाराष्ट्रात भाजप प्रणित महायुतीने 45 + जागा मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिन्ही नेते त्याच आकड्याचे तुणतुणे वाजवत आहेत, पण त्या आकड्याला विरोध करताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्रात आघाडीला फक्त 32 – 33 जागा मिळतील, एवढेच सांगितले आहे.

    महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 32 – 33 जागा मिळतील आणि केंद्रात “इंडिया” आघाडीला 290 ते 300 जागा मिळतील, असे भाकित महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वतःहून वर्तविले आहे. म्हणजे एकीकडे मोदींनी अब की बार 400 पार आणि भाजप 370 पार अशी घोषणा दिली आहे, तर मोदींना विरोध करता आला त्यांच्याशी प्रतिस्पर्धा करताना विरोधक मात्र 300 चा आकडा गाठायलाही तयार नाहीत, असे त्यांच्या स्वतःच्याच तोंडच्या वक्तव्यातून दिसून येत आहे.

    भाजपने 430 उमेदवार आधीच जाहीर केले आहेत, पण काँग्रेस अजून उमेदवार जाहीर करण्यात देखील 300 चाही आकडा गाठू शकलेली नाही. काँग्रेसने आजपर्यंत फक्त 278 उमेदवार जाहीर केले आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना 22 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 10 एवढ्याच तोकड्या जागांवर निवडणूक लढवत आहे. काँग्रेस पाठोपाठ अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी सगळ्यात जास्त म्हणजे 63 जागा लढवत आहे. बाकी सगळे प्रादेशिक पक्ष 20 ते 25 जागांच्या पुढे जायलाच तयार नाहीत. आणि या सगळ्यांना फक्त मोदींना हरवायचे आहे. बाकी त्यांच्याकडे ना खरा आकडा आहे, ना त्यांच्याकडे खरा नेतृत्वाचा पर्याय आहे!!

    या पलीकडे जाऊन शरद पवारांचे तर वक्तव्य मोदींची ताकद कमी करायची आहे, एवढ्या पुरतेच मर्यादित आहे. म्हणजे शरद पवारांना काँग्रेस प्रणित “इंडिया” आघाडीला बहुमत मिळेल, ती 290 ते 300 हा आकडा गाठेल हे सुद्धा मान्य नसल्याचे दिसून येते. त्या उलट संजय राऊत यांनी निदान महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35 जागा मिळवेल आणि देशात इंडिया आघाडी 305 जागा मिळवेल असा थोडा पुढचा आकडा सांगितला आहे. पण याविषयी ना शरद पवारांना खात्री आहे, ना जयंत पाटलांना. कारण दोघांनीही आपला आकडा 32 – 33 पर्यंतच अडकवून ठेवला आहे.

    राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये पंतप्रधान मोदींवर या दोन्ही नेत्यांनी भरपूर पण नेहमीचीच टीका केली, पण काँग्रेस आणि समाजवादी पार्टी उत्तर प्रदेशात नेमक्या किती जागा जिंकले?? देशात “इंडिया” आघाडीने किती जागा जिंकण्याचे ध्येय ठेवले आहे??, या प्रश्नांवर मात्र उत्तर देण्याचे टाळले.

    INDI alliance targets only 290 – 300 seats infront of Modi’s ab ki baar 400 paar…!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!