• Download App
    Devendra Fadnavis महाराष्ट्रातल्या आरोग्य सेवेत AI चा वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना

    महाराष्ट्रातल्या आरोग्य सेवेत AI चा वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना

    – लोकाभिमुख, वेगवान आणि सक्षम‌ AI – आधारित आरोग्य व्यवस्थेकडे मार्गक्रमण!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे, महाराष्ट्रातील शेवटच्या घटकापर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या दृष्टीने आरोग्य क्षेत्रात परिवर्तन आणणाऱ्या विशेष प्रकल्पाबाबत बैठक पार पडली.

    यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढेल, उपचार अधिक अचूक आणि वेळेत होतील आणि ग्रामीण तसेच दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा प्रभावीपणे पोहोचवता येतील. आजच्या डिजिटल युगात आरोग्य व्यवस्थेचे डिजिटायझेशन आणि एआय आधारित उपाययोजना अत्यंत आवश्यक आहेत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, वेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात यावा, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

    पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये भाजपची अजितदादांच्या राष्ट्रवादीशी नाही युती; देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती

    यावेळी ‘समग्र’ संस्थेच्या वतीने सार्वजनिक आरोग्य सेवा बळकटीकरणाबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. आरोग्य संस्थांचे स्टार रेटिंग, आरोग्य सेवांचा समीक्षा अहवाल, आरोग्य हेल्पलाईन, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तसेच सेवा गुणवत्तेचे नियमित मूल्यमापन यांसारख्या उपक्रमांचा या सादरीकरणात समावेश होता. या उपक्रमांमुळे नागरिकांचा आरोग्य सेवांवरील विश्वास अधिक दृढ होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. तसेच राज्यातील आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय साधून दीर्घकालीन सुधारणा करण्यावर शासनाचा भर राहील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    Increase the use of AI in Maharashtra’s healthcare services; Chief Minister Devendra Fadnavis’s instructions.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    राष्ट्रवादीतली घोटाळखोरी; सगळे “पवार संस्कारित” अमित शाहांच्या दारी!!

    महाराष्ट्रात फडणवीस सरकारच्या तिसऱ्या कारकिर्दीत १०० दिवसांमध्ये ४८ कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी!!

    अजितदादांची विरोधकांकडून नव्हे, तर भाजपकडून चोहोबाजूंनी कोंडी; माणिकरावंपासून पार्थ पर्यंत उडाली दांडी!!