• Download App
    कमाल तापमानात वाढ, बंगालच्या उपसागरमध्ये कमी दाबाचे क्षेत्र; चक्रीवादळामुळे उष्णतेची लाटेचा धोका Increase in maximum temperature, low pressure area in Bay of Bengal; Risk of heat waves due to cyclones

    कमाल तापमानात वाढ, बंगालच्या उपसागरमध्ये कमी दाबाचे क्षेत्र; चक्रीवादळामुळे उष्णतेची लाटेचा धोका

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या उपसागरमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून चक्रीवादळामुळे उष्णतेची लाटेचा धोका वाढला आहे. पुढील दोन दिवसांत उत्तर-पश्चिम भारत आणि पश्चिम मध्यप्रदेशातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. Increase in maximum temperature, low pressure area in Bay of Bengal; Risk of heat waves due to cyclones

    हिंदी महासागर आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. ते चक्रीवादळात परावर्तीत होईल. त्याचा परिणाम तापमानवाढीवर होणार आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागू शकतो.

    चक्रीवादळामुळे १९ व २० मार्चदरम्यान अंदमान, निकोबार बेटांवर जोरदार वारे, मुसळधार पाऊस पडेल. यातून नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटा येणार आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले. सौराष्ट्र-कच्छच्या भागात उष्णतेच्या लाटेची तीव्र स्थिती नोंदवली गेली. कोकण-गोवा आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागात उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट नोंदवली गेली.

    Increase in maximum temperature, low pressure area in Bay of Bengal; Risk of heat waves due to cyclones

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस