• Download App
    करुणा शर्मा यांच्या अडचणीत वाढ; न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला, पुढील सुनावणी आता सोमवारी होणार|Increase in Karuna Sharma's difficulty; The stay in the judicial custody has been extended, with the next hearing now set for Monday

    करुणा शर्मा यांच्या अडचणीत वाढ; न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला, पुढील सुनावणी आता सोमवारी होणार

    प्रतिनिधी

    बीड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठीकरुणा शर्मा या बीडच्या परळीत आल्या होत्या. त्यानंतर अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मांच्या जमिनीवरील निर्णय सोमवारपर्यंत पुढे गेला आहे.Increase in Karuna Sharma’s difficulty; The stay in the judicial custody has been extended, with the next hearing now set for Monday

    न्यायाधीश सापटनेकर यांच्यासमोर आज दोन्ही बाजुंच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे. न्यायालय यावर सोमवारी निर्णय देणार आहे. शर्मा यांना ५ सप्टेंबरला अटक झाली होती. आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन त्यांनी खळबळ उडवून दिली होती.



    परळी येथे आल्यानंतर एका महिलेला जातिवाचक शिविगाळ केली आणि प्राणघातक हल्ला केला म्हणून करुणा शर्मांसह त्यांचा सहकारी अरुण मोरेंवर गुन्हा दाखल झाला होता. परळी पोलिसांनी त्यांना ५ सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर ६ सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

    त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, सुनावणी पुढे ढकलली जात होती. आज न्यायाधीश सापटनेकर यांच्यासमोर शर्मा यांच्या जामिनावर सुनावणी झाली. शर्मा यांच्यावतीने अँड. जयंत भारजकर यांनी बाजू मांडली

    तर सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकिल अशोक कुलकर्णी यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सोमवारी निर्णय देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे करुणा शर्मांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

    Increase in Karuna Sharma’s difficulty; The stay in the judicial custody has been extended, with the next hearing now set for Monday

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ