प्रतिनिधी
मुंबई : वीजमीटरचे फोटो रीडिंग घेण्याची प्रक्रिया स्वतंत्र मोबाईल अॅपद्वारे सोपी आणि वेगवान झाली आहे. मीटरच्या रीडिंगसाठी एजन्सीजना मोबादला दिला जातो. तरीही मीटरचे चुकीचे रीडिंग घेणे, फोटो अस्पष्ट असणे, रीडिंग न घेता आल्याचा शेरा देणे, असे प्रकार होत असल्यास, ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा महावितरणचे अध्यक्ष विजय सिंघल यांनी दिला आहे. वीजग्राहकांच्या हक्क आणि संरक्षणासाठी हा इशारा महत्त्वाचा मानला जात आहे. Incorrect readings of electricity meters will not be tolerated; A warning to agencies of Mahavitaran
विजय सिंघल हे दर पंधरवड्याला प्रामुख्याने अचूक मीटर रीडिंग संदर्भात आढावा घेत आहेत. मुख्यालयासोबतच क्षेत्रीय स्तरावरील विविध उपाययोजना तसेच कामात कुचाराई करणा-या एजन्सीविरुद्ध सुरु असलेली कारवाई यामुळे मीटर रीडिंगमध्ये सुधारणा झाली आहे. ग्राहकांना रीडिंगनुसार, वीज वापराचे योग्य वीजबिल मिळत असल्याने, त्यांच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप व बिल दुरुस्तीचा त्रास तसेच महसुलाचे नुकसान अजिबात सहन केले जाणार नाही. मीटरचे अचूक रीडिंग घेण्यात हयगय करणा-या एजंसीविरुद्ध कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
– वीजगळती कमी
वीजगळती कमी करण्यासोबतच ग्राहक हिताच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत ग्राहकाभिमुख सेवेच्या सुधारणांना मोठा वेग देण्यात आला आहे. यात बिलिंगसाठी वीज मीटरच्या अचूक रीडिंगला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे.
Incorrect readings of electricity meters will not be tolerated; A warning to agencies of Mahavitaran
महत्वाच्या बातम्या
- संसदेत गदारोळ : राज्यसभेचे 19 सदस्य आठवडाभरासाठी निलंबित, महागाई, खाद्यपदार्थांवरील जीएसटीवर चर्चेची विरोधकांची मागणी
- पालापाचोळ्यांनीच घडविला इतिहास; एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
- मातोश्रीतून एकनाथ शिंदेंआधी माझ्याही हत्येची सुपारी; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
- महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला अध्यक्ष मिळाले चार वेळा विदर्भ केसरी स्पर्धा जिंकणारे रामदास तडस!!; पवारांचे वर्चस्व संपुष्टात