• Download App
    अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरी आयकर विभागाचे छापे; अनिल देशमुख घरी नव्हते सर्च ऑपरेशन सुरू |Income tax department raids Anil Deshmukh's Nagpur home; Anil Deshmukh was not at home and search operation was started

    अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरी आयकर विभागाचे छापे; अनिल देशमुख घरी नव्हते सर्च ऑपरेशन सुरू

    वृत्तसंस्था

    नागपूर : मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, बार चालकांकडून 100 कोटींची खंडणी वसूल करण्याप्रकरणी राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकार मधील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी आयकर विभागाने छापे घातले आहेत. अधिकाऱ्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.Income tax department raids Anil Deshmukh’s Nagpur home; Anil Deshmukh was not at home and search operation was started

    या छाप्याच्या वेळी अनिल देशमुख, त्यांचे दोन मुलगे घरी नव्हते. अनिल देशमुख यांच्या पत्नी आणि काही खाजगी कर्मचारी हेच घरात आहेत. आयकर विभागाचे अधिकारी सध्या घराची झडती घेत असून त्यामध्ये नेमके काय मिळते याची माहिती अद्याप बाहेर आलेली नाही.



    शंभर कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांच्या मागे सीबीआय आणि आयकर विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. आजचा आयकर विभागाचा छापा या चौकशीचाच एक भाग आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

    Income tax department raids Anil Deshmukh’s Nagpur home; Anil Deshmukh was not at home and search operation was started

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अजितदादांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती फक्त पुणे जिल्ह्यात??, ZP निवडणुकीत भाजपच नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी नंबर 3, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 6 नंबर वर!!

    राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प, फडणवीस विदर्भ आणि तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!

    ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती