प्रतिनिधी
मुंबई : उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मशिदींवरचे जरूर उतरवले, पण ते काम हिंदुत्वाचे नाही, तर खऱ्या धर्मनिरपेक्षतेचे आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकसत्ताच्या “दृष्टी आणि कोन” या मुलाखतीत काढले. अजनाच्या नावाखाली अजाणतेपणे काहीजण त्याला धार्मिक रंग देतात, असा टोला त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. In Uttar Pradesh, Chief Minister Yogi Adityanath has definitely landed on mosques loudspear
राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांचा विषय अचानक उकरून काढला. त्याला महाराष्ट्रात राजकीय प्रतिसाद मिळाला. पण प्रत्यक्षात काम उत्तर प्रदेशात झाले. तर त्यावर थेट उत्तर न देता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला धर्मनिरपेक्षतेची बगल दिली.
योगी आदित्यनाथ यांनी फक्त मशिदींवरचे भोंगे उतरवले नाहीत, तर मंदिरांवरचे भोंगे पण उतरवले. परवानगी मागितलेले भोंगे पुन्हा चढवणार आहेत. त्यामुळे हे काम हिंदुत्ववादी नाही, तर खऱ्या धर्मनिरपेक्षतेचे आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मूळ मुद्द्याला बगल दिली. उत्तर प्रदेशातला कोरोना काळातल्या मृतांच्या आकड्यां विषयी शंका व्यक्त केली.
मात्र राज ठाकरे हे जे योगींना प्रखर हिंदुत्वाचे आयकॉन ठरवायला निघाले आहेत, त्यांना उद्धव ठाकरे यांनी एकदम धर्मनिरपेक्षतेचे सर्टिफिकेट देऊन टाकले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. योगींना धर्मनिरपेक्ष मानल्यामुळे त्या धर्मनिरपेक्षतेलाच फॉलो करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातल्या मशिदींवरचे भोंगे उतरवणार तर नाहीत ना??, अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त होऊ लागली आहे. तसे झाले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या धर्मनिरपेक्षतेचे काय होणार?? असे संवालही विचारण्यात येत आहेत.