प्रतिनिधी
मुंबई : पवई आयआयटी गेट समोर असलेल्या एक पडीक जागेत आज पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान भीषण आग लागली होती. या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक आणि बांबू पडलेले होते. ते पेटल्याने आग काही वेळेत इतरत्र भडकली. In the wasteland of Powai IIT Gate Terrible fire, garbage, bamboo, plastic burnt
स्थानिकांनी याची माहिती अग्निशमन दलाला देताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.काही वेळेतच अग्निशमन दलाच्या जवांनानी या आगीवर नियंत्रण मिळविले.आग लागली होती त्या ठिकाणी आजूबाजूला मोठी रहिवासी वस्ती आहे.सुदैवाने आगीवर नियंत्रण लवकर मिळविल्याने आग आजूबाजूच्या वस्तीत पसरली नाही आणि मोठी हानी टळली आहे.आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.
In the wasteland of Powai IIT Gate Terrible fire, garbage, bamboo, plastic burnt
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान