• Download App
    Ayodhya Ram Mandir : प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी आता आणखी वाट नाही पाहावी लागणार; पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार मूर्तीची प्रतिष्ठापना!In the third week of January 2024 the idol of Lord Ram Lalla will be installed at its original location in  temple in Ayodhya

    Ayodhya Ram Mandir : प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी आता आणखी वाट नाही पाहावी लागणार; पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार मूर्तीची प्रतिष्ठापना!

    (संग्रहित छायाचित्र)

     जाणून घ्या कधी होणार आहे प्रतिष्ठापना, स्वामी गोविंद देव गिरी महाराजांनी दिली माहिती

    प्रतिनिधी

    डोंबिवली :  अयोध्येतील ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र’चे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. जानेवारी २०२४ च्या तिसर्‍या आठवड्यात अयोध्येतील निर्माणाधीन मंदिरात प्रभू राम लल्लाची मूर्ती मूळ जागेवर स्थापित केली जाणार आहे. In the third week of January 2024 the idol of Lord Ram Lalla will be installed at its original location in  temple in Ayodhya

    डोंबिवली एमआयडीसीतील एम्स रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘’पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी २०२४ च्या तिसर्‍या आठवड्यात अयोध्येतील निर्माणाधीन मंदिरात प्रभू राम लल्लाची मूर्ती मूळ जागेवर स्थापित करतील.’’


    पंतप्रधान नरेंद्र मोदी नोबेल शांतता पुरस्काराचे प्रबळ दावेदार; नॉर्वेच्या नोबेल समिती सदस्याकडून प्रशंसा


    याशिवाय स्वामी गोविंद देव गिरीज महाराज म्हणाले की, ”अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम जोमाने सुरू आहे. ७० टक्के काम झाले आहे. गर्भगृहाचे काम, पहिला मजला आणि दर्शनाची व्यवस्था पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, तर मंदिराच्या उर्वरित कारागिरीचे काम सुरूच राहील.”

    याचबरोबर  ”मंदिराच्या गर्भगृहाचे काम वर्षभरात पूर्ण होऊन तेथे राम लल्लांची प्राणप्रतिष्ठा केली जाईल, या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. जानेवारी २०२४ च्या तिसर्‍या आठवड्यात प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल आणि त्या दिवसापासून भक्तांसाठी दर्शन आणि पूजा करण्याची व्यवस्था केली जाईल.” अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

    In the third week of January 2024 the idol of Lord Ram Lalla will be installed at its original location in  temple in Ayodhya

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??

    मराठा आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्या‌ राजकीय पक्षांचे होईल मोठे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा!!

    Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले- जरांगे चर्चेसाठी तयार असतील, तर सरकारही तयार; दोन्हीही बाजूंनी समन्वय आवश्यक