वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात उन्हाचा चटका जाणवत असून , उकाड्याने जनता हैराण झाली आहे. अनेक ठिकाणी तर पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. मुंबई परिसरासह कोकण विभागातील किमान तापमान अद्यापही सरासरीपुढे आहे. In the state hot summer, Mercury above 40 degrees Celsius in many places
पुढील दोन दिवसांनंतर मात्र तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. राज्यात १३ मार्चपासून तापमानातील वाढ सुरू झाली होती. राजस्थानपासून गुजरातपर्यंत असलेल्या उष्णतेच्या लाटेचा परिणाम म्हणून मुंबई परिसरासह कोकण विभागात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली होती. मुंबई परिसराचे कमाल तापमान सरासरीच्या तुनलेत ५ ते ६ अंशांनी वाढले होते. सध्याही मुंबई परिसरातील कमाल तापमान सरासरीच्यचा तुलनेत अधिक आहे. राजस्थान, दक्षिण मध्य प्रदेश आणि तेलंगणा आदी राज्यांमध्ये सध्या उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. विदर्भातही काही भागात उष्णतेची लाट आली आहे. जवळपास सर्वच भागातील कमाल तापमान ४० अंशांपुढे गेले आहे.
मराठवाडय़ात सर्वच भागांतील कमाल तापमान ४० अंशांपुढे गेले आहे. त्यामुळे या भागातही उन्हाचा चटका तीव्र आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सोलापूर आदी भागांतही कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून, सरासरीच्या तुलनेत ते ३ ते ४ अंशांनी वाढले आहे. राज्यात आणखी एक ते दोन दिवस तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. दोन दिवसांनंतर कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
In the state hot summer, Mercury above 40 degrees Celsius in many places
महत्त्वाच्या बातम्या
- केवळ २५ कोटी रुपयांमध्ये पेगाससची घेण्याची होती ऑफर, ममता बॅनर्जी यांचा दावा
- काश्मीरी पंडीतांचा परतीचा मार्ग सुकर होईल का? द काश्मीर फाईल्सवर ओमर अब्दुल्ला यांचा गर्भित इशारा
- जायंट किलर्सचे आपकडून नुसतेच कौतुक, मंत्रीमंडळात स्थान मात्र नाही
- योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; २५ मार्चला मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार
- संभाजी भिडे म्हणतात, औरंगजेब आजही पाकिस्तान, बांगलादेश व गावात असलेल्या मुसलमानांच्या रूपाने शिल्लक