• Download App
    राज ठाकरेंच्या हस्ते मारुती मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसाचे पठणIn the presence of Maharashtra Navanirman Sena leader Raj Thakare Hanuman chalisa pathan at khalkar chowk maruti tempal

    राज ठाकरेंच्या हस्ते मारुती मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसाचे पठण

    जय श्रीराम, जय हनुमान’च्या घोषणांमध्ये हनुमान जयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात महाआरती पार पडली. यावेळी हा परिसर घोषणांनी दुमदुमला होता.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे – ‘जय श्रीराम, जय हनुमान’च्या घोषणांमध्ये हनुमान जयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात महाआरती पार पडली. यावेळी हा परिसर घोषणांनी दुमदुमला होता. In the presence of Maharashtra Navanirman Sena leader Raj Thakare Hanuman chalisa pathan at khalkar chowk maruti tempal

    महाआरतीसाठी शहर मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. याचे आयोजन मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी केले होते. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, बाबू वागस्कर,किशोर शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, वसंत मोरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

     

    खालकर चौक मारुती मंदिर परिसरात दुपारपासून मंदिर परिसरात ढोलताशा, झांज पथक सुरू होते. या परिसरात हिंदूजननायक राज ठाकरे असे फलक लावले होते. त्या फलकावर मागे मारूती पुढे राज ठाकरे दिसत होते.साडेसातच्या सुमारास ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरेंचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर महाआरतीला सुरुवात झाली. महाआरतीनंतर हनुमान चालिसा पठणही झाले.

    यावेळी हनुमान चालिसा छापलेल्या लहान पुस्तिकांचे जनसमूदायाला वाटप ही करण्यात आले होते. यावेळी खालकर चौकात मनसे कार्यकर्ते, नागरिकांची मोठी गर्दी केली होती.
    गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मशिदीवरील भोंग्यांवरून वाद सुरू आहे. भोंगे येत्या ३ मे पर्यंत उतरवले नाहीत तर, त्यासमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला होता.त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते.

    दरम्यान, मनसेला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शनिवारी मुस्लिमांच्या हस्ते मारुती आरती आणि इफ्तार पाटीर्चे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

    In the presence of Maharashtra Navanirman Sena leader Raj Thakare Hanuman chalisa pathan at khalkar chowk maruti tempal

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!