• Download App
    मंत्री नवाब मलिकांच्या जागेत बोकडांचा बाजार, उस्मानाबाद जिल्ह्यात आहे दीडशे एकर जमीन|In the place of Minister Nawab Malik, there is a goat market, One and a half hundred acres of land in Osmanabad district

    मंत्री नवाब मलिकांच्या जागेत बोकडांचा बाजार, उस्मानाबाद जिल्ह्यात आहे दीडशे एकर जमीन

    राष्टवादी कॉँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या उस्मानाबाद येथील जमीनीवर ऐन लॉकडाऊनमध्ये बोकडांचा बाजार भरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मलिक यांनी ही १५० एकर जमीन मलिक यांनी पत्नी आणि मुलांच्या नावे 2014 मध्ये खरेदी केलेली आहे.In the place of Minister Nawab Malik, there is a goat market, One and a half hundred acres of land in Osmanabad district


    विशेष प्रतिनिधी

    उस्मानाबाद : राष्टवादी कॉँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या उस्मानाबाद येथील जमीनीवर ऐन लॉकडाऊनमध्ये बोकडांचा बाजार भरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

    मलिक यांनी ही १५० एकर जमीन मलिक यांनी पत्नी आणि मुलांच्या नावे 2014 मध्ये खरेदी केलेली आहे.उस्मानाबाद तालुक्यातील जवळा दुमाला येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोरोनाचे नियम डावलून शेळी आणि बोकडाचा बाजार भरत असल्याचा प्रकार उघड झाला.



    हा बाजार मागील तीन ते चार आठवड्यापासून भरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले . बाजारात शेकडो विक्रेते, खरेदीदार, शेळ्या, मेंढ्या, बोकडे तसेच 50 ते 70 च्या जवळपास छोटी, मोठी वाहने जिल्ह्यातील तसेच पर जिल्ह्यातून येत रात्रीच्या अंधारात येत होती. तिथे हा बाजार भरवला जात होता.

    बाजार स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ढोकी पोलिस ठाण्यातील कर्मचाºयांना याची माहिती दिली. रात्री बारा ते चार दरम्यान हा बाजार भरवला जातो. तो गावापासून चार किमी अंतरावर बाजार होत असल्याने गावात कुणालाही माहीत होत नाही.

    त्याचे व्हिडिओ पण व्हायरल झाले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत त्या ठिकाणाच्या जमलेली वाहने आणि जमाव पांगवला.भारतीय जनता पक्षाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी सांगितले की, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन आहे.

    तरीही नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावे जवळा धुमाळा येथील जमीनीवर सहा आणि सात आठवड्यापासून सोमवारी रात्रीपासून ते मंगळवार सकाळपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात जनावरांचा बाजार भरतो.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर जनावरांचा बाजार हा फक्त मलिक यांच्या पाठिंब्यावरच भरत असल्याचा आहे. तरीर देखील उद्धव ठाकरे सरकार नवाब मलिक यांच्या या कारनाम्याकडे कानाडोळा करत असून, आम्ही तातडीने नवाब मलिक यांचा राजीनामा मागत आहे.

    मोठ्या प्रमाणात शेळ्यांची खरेदी विक्री, शेकडो व्यापारी बाजारात दरम्यान, सदर बाजार हा उस्मानाबाद तालुक्यातील जावळे धुमाळा या गावात भरवण्यात आला होता.

    या बाजारात शेकडो गाड्या शेळ्यांची वाहतूक करण्यासाठी आल्या होत्या. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग देखील दाखल झाला होता.
    जावळे धुमाळा या गावात भरवण्यात आलेला बाजार पूर्वी येडशी या गावानजीक भरवला जात होता.

    मात्र, यागावातील नागरिकांनी विरोध केल्याने शेळ्यांचा बाजार हा जावळे धुमाळा या गावात भरवण्यात येऊ लागला आहे. जावळे धुमाळा या गावाची लोकसंख्या १७०० इतकी आहे.

    बाजार भरवणारे तसेच अन्य कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. याचे कारण मंत्री नबाब मलिक यांचा दबाव असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केला आहे.

    In the place of Minister Nawab Malik, there is a goat market, One and a half hundred acres of land in Osmanabad district

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस