विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील लेबर कॉलनीतील राहणाऱ्या कर्मचारी यांनीप्रशासनाची संवाद साधला आहे, प्रशासनाने लेबर कॉलनीतील जुने झालेले निवासस्थाने तोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या ४० वर्षापासून येथे शासकीय कर्मचाऱ्यांचे नातेवाईक व शासकीय कर्मचारी राहतात,In the Labor Colony of Aurangabad The old house will be bulldozed
सदरील कर्मचाऱ्यांची दुसऱ्या ठिकाणी कायमची व्यवस्था करण्याची मागणी शासकीय कर्मचारी घर बचाव समितीच्या वतीने प्रशासनाला केली आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे की,पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
मात्र संबंधित निवासस्थाने रिकामी करून देण्याची विनंती जिल्हाधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना केली होती.आता सदरील निवासस्थाने जमीनदोस्त होणार असल्याने येथे राहणाऱ्या नागरिकांनी धास्ती घेतली आहे,सदरील निवासस्थाने पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून दिवाळीनंतर घरे पाडण्याचा अल्टिमेट नागरिकांना देण्यात आला होता, त्या अनुषंगाने आज येथील नागरिकांनी एकत्रित पणे प्रशासनाची संवाद साधला आहे.
- औरंगाबादच्या लेबर कॉलनी जुनी घरे पडणार
- दिवाळीनंतर घरे पाडण्याचा दिला अल्टिमेट
- प्रशासन घरावर बुलडोझर फिरविणार
- कर्मचारी, नातेवाईक धास्तावले
- प्रशासनाशी संवाद साधून घरे वाचविण्याचा प्रयत्न
- अन्यत्र राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी
In the Labor Colony of Aurangabad The old house will be bulldozed