• Download App
    अखेर मार्डच्या लढ्याला मिळाले यश , कोविड रुग्णसेवेसाठी प्रत्येक निवासी डॉक्टरांना मिळणार १ लाख २१ हजार रुपयेIn the end, Mard's fight was a success. Every resident doctor will get Rs 1 lakh 21 thousand for Kovid patient service

    अखेर मार्डच्या लढ्याला मिळाले यश , कोविड रुग्णसेवेसाठी प्रत्येक निवासी डॉक्टरांना मिळणार १ लाख २१ हजार रुपये

    या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय व महानगरपालिकांच्या वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर्स यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.In the end, Mard’s fight was a success. Every resident doctor will get Rs 1 lakh 21 thousand for Kovid patient service


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शासकीय व महापालिका वैद्यकीय महाविद्यालय, तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सर्व निवासी डॉक्टरांना कोविड काळात त्यांनी बजावलेल्या रुग्ण सेवेसाठी ऋणनिर्देश म्हणून प्रत्येकाला १ लाख २१ हजार रुपये देण्यात येणार आहे.

    काही दिवसांपूर्वी राज्यभरात निवसी डॉक्टर्स आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले होते. संपूर्ण राज्यभर हा संप झाल्यामुळे आरोग्यसेवेवर ताण पाडण्याची शक्यता होती.



    त्यामुळे सरकारने मार्ड संस्थेच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. तसेच सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले.याच आश्वासनाची पूर्तता म्हणून सरकारने वरील निर्णय जाहीर केला आहे.

    या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय व महानगरपालिकांच्या वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर्स यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यशासनाच्या या निर्णयामुळे आम्हाला रुग्णसेवा करण्याची प्रेरणा मिळणार आहे, अशी भावना महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

    In the end, Mard’s fight was a success. Every resident doctor will get Rs 1 lakh 21 thousand for Kovid patient service

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!