• Download App
    अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत अर्ज भरण्याच्या दिवशीच शिवसेना - भाजपमध्ये रंगली मतदानाच्या टक्केवारीची टक्करIn the Andheri East by-election, on the day of filing of applications, Shiv Sena-BJP clashed on the voting percentage

    अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत अर्ज भरण्याच्या दिवशीच शिवसेना – भाजपमध्ये रंगली मतदानाच्या टक्केवारीची टक्कर

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेनेतील उभ्या फुटी नंतर प्रथमच थेट मतदारांपुढे जाऊन टक्कर होत असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आज 14 ऑक्टोबर 2022 अर्ज भरण्याच्या दिवशीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे + काँग्रेस – राष्ट्रवादी आणि भाजप + बाळासाहेबांची शिवसेना युती यांच्यात मतदानाच्या टक्केवारीची टक्कर रंगली आहे. In the Andheri East by-election, on the day of filing of applications, Shiv Sena-BJP clashed on the voting percentage

    भाजप + बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या विजयाचा दावा करून मोठ्या मताधिक्याने विजयी होऊच, पण 51% मते भाजपच्या उमेदवाराला मिळतील, असा दावा केला होता.



    या दाव्याला शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रमेश लटके यांच्या निधनामुळे सहानुभूतीची लाट ऋतुजा लटके यांच्या बाजूने असेल. त्यांना 65 % मतदान होईल. हे ज्यांना कळत नसेल, ज्यांना अक्कल नसेल त्यांना काय सांगणार?, असा खोचक सवाल त्यांनी केला. रवींद्र वायकर यांनी मतदानाची टक्केवारी विभागून सांगितली. अंधेरी पूर्व काँग्रेसचा बालेकिल्ला असताना तेथे तीन वेळा काँग्रेसचे आमदार होते परंतु रमेश लटके दोनदा विजय झाले तेव्हा त्यांना 31 % टक्के मते मिळाली होती. शिवाय काँग्रेसची 25% मते ऋतुजा लटकेंनाच मिळणार आहेत. बाकीची मिळून एकूण 65 % टक्के मते त्यांच्या बाजूने उभे राहतील आणि भाजप उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल, असा दावा रवींद्र वायकर यांनी केला आहे.

    भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी हा दावा फेटाळून आपण अपक्ष उमेदवार असताना या मतदारसंघात 48000 मते घेतली होती. आता तर भाजपची मते त्यात जास्तीची मिळणार आहेत त्यामुळे 30000 हजार मतांच्या फरकाने आपण निवडून येऊ, असा दावा मुरजी पटेल यांनी केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशीच अशी मतदानाच्या टक्केवारीची टक्कर रंगली आहे

    In the Andheri East by-election, on the day of filing of applications, Shiv Sena-BJP clashed on the voting percentage

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस