• Download App
    सोलापुरात महिला रुग्णांवर डॉक्टरीणबाईच करणार उपचार, राज्यातील अभिनव उपक्रम।In Solapur, only female doctors will treat women patients

    सोलापुरात महिला रुग्णांवर डॉक्टरीणबाईच करणार उपचार, राज्यातील अभिनव उपक्रम

    वृत्तसंस्था

    सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पाच हजार लोकसंख्येच्या गावात ‘गाव तिथं कोविड केअर सेंटर’ उभारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. विशेष म्हणजे महिला कोरोना रुग्णांवर महिला डॉक्टर आणि कर्मचारीच उपचार करणार आहेत. In Solapur, only female doctors will treat women patients



    ग्रामीण भागातील महिला रुग्णांना पुरुष वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना होणारा त्रास सांगणे शक्य होत नाही. त्यामुळे त्या अडचणीत येतात. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कोविड केअर सेंटरमध्ये महिला वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांची नियुक्ती केली. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी सोलापूर जिल्हा परिषद राज्यातील पहिली ठरली आहे.

    जिल्ह्यात 100 कोविड केअर सेंटर्स उभारणार

    जिल्ह्यात 100 कोविड केअर सेंटर्स उभारणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी  दिली. शहरातील मोठ्या दवाखान्यांत जावे लागू नये म्हणून ग्रामस्थ आजार लपवत आहेत. त्यांच्यावर गावात उपचार करता यावेत, यासाठी 100 कोव्हिड सेंटर उभारणार असल्याचे ते म्हणाले. 12 गावात कोविड केअर सेंटर सुरू झाली असून अन्य गावात 1 मेपासून सुरू करणार आहे, असेही स्वामी यांनी सांगितले.

    In Solapur, only female doctors will treat women patients

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!