• Download App
    संभाजीनगरात बागेश्वर धामच्या दरबारामध्ये 9 मुस्लिमांची घरवापसी, नगरच्या जमीर शेख कुटुंबीयांनी स्वीकारला हिंदू धर्म|In Sambhajinagar, 9 Muslims returned home in the court of Bageshwar Dham, Jamir Sheikh family of the city accepted Hinduism.

    संभाजीनगरात बागेश्वर धामच्या दरबारामध्ये 9 मुस्लिमांची घरवापसी, नगरच्या जमीर शेख कुटुंबीयांनी स्वीकारला हिंदू धर्म

    प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात आयोजित श्री बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या कथेच्या समारोपप्रसंगी अहमदनगर येथील जमीर शेख यांच्या कुटुंबातील ९ सदस्यांनी बुधवारी शास्त्रींच्या हस्ते दीक्षा घेत हिंदू धर्मात प्रवेश केला. लहानपणापासून आपण हिंदू रिवाजानुसार पूजापाठ करीत असून सनातन धर्मावरील श्रद्धेमुळे हे धर्मांतर करीत असल्याच्या भावना शेख यांनी व्यक्त केल्या. आपण दोन्ही मुलींची लग्ने हिंदू धर्मात करून दिल्याचेही त्यांनी सांगितले.In Sambhajinagar, 9 Muslims returned home in the court of Bageshwar Dham, Jamir Sheikh family of the city accepted Hinduism.



    व्यवसायाने मजूर असलेले शेख लहानपणापासून हिंदू रिवाजांनुसार पूजापाठ करत आहेत. त्यांना हिंदू धर्मात यायचे होते. त्यासाठी काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना या कार्यक्रमात या धर्मांतराची संधी मिळवून दिली. या धर्मांतरासाठी आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचे ते म्हणाले.

    दै. दिव्य मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, शिवराम आर्य पूर्वाश्रमीचे जमीर शेख म्हणाले की, मला 5 मुलीच होत्या. मुलगा होण्यासाठी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी… हे भजन गायले. कृष्णाला अभिषेकही केला. श्रावणात मला मुलगा झाला. देवी शेरावाली प्रसन्न आहे. धर्मांतर करण्याची माझी इच्छा होती. दबाव कुणाचाच नव्हता.

    In Sambhajinagar, 9 Muslims returned home in the court of Bageshwar Dham, Jamir Sheikh family of the city accepted Hinduism.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!