• Download App
    रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेत पवारांनी काढली आपल्या शेतकरी दिंडीची आठवण!!In Rohit Pawar's Yuva Sangharsh Yatra, Pawar remembered his farmer Dindi

    रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेत पवारांनी काढली आपल्या शेतकरी दिंडीची आठवण!!

    प्रतिनिधी

    पुणे : दसरा मेळाव्याच्या राजकीय धामधुमीमध्ये संघ परिवार – भाजप, शिवसेनेचे दोन गट, रिपब्लिकन पार्टीचे सर्व गट तसेच पंकजा मुंडे यांच्या सारख्या सध्याच्या एकांड्या शिलेदार आपापली ताकद आजमावत असताना यात राष्ट्रवादी काँग्रेस पिछाडीवर गेल्यासारखे दिसत होते. त्यामुळे आमदार रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रेचा प्रारंभ दिवस विजयादशमीचा निवडला. पुण्यात टिळक स्मारक मंदिरात या युवा संघर्ष यात्रेचा प्रारंभ करताना शरद पवारांनी त्यांनी त्यांच्या राजकीय आयुष्याच्या पूर्वार्धात काढलेल्या शेतकरी दिंडीची आठवण काढली. In Rohit Pawar’s Yuva Sangharsh Yatra, Pawar remembered his farmer Dindi

    राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदनिष्ठ गट राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष करत असताना खुद्द पवारांच्याच घरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पडण्याची भीती निर्माण झाल्यानंतर रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रा काढली आहे. या युवा संघर्ष यात्रेत शरद पवारांनी जोरदार भाषण केले. शिंदे – फडणवीस सरकारवर वेगवेगळे आरोप केले.

    पवारांनी ते भाषण आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले ते असे :

    आमदार श्री. रोहित पवार यांनी सुरुवात केलेल्या महाराष्ट्रातील तमाम युवकांना विश्वास आणि बळ देणाऱ्या ‘युवा संघर्ष यात्रा’ याला आजपासून पुण्यातून सुरुवात झाली. यावेळी उपस्थित सर्व तरुण युवकांना मार्गदर्शन केले. सन्माननीय व्यासपीठ लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व उपस्थित मान्यवर श्रीनिवास पाटील, ज्यांनी हा सगळा अतिशय धाडसी आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातील असंख्य तरुणांच्या मनातील जो विचार आहे तो मांडून समाजामध्ये एक प्रकारची जागृती करण्याचा एक अतिशय मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि महाराष्ट्रातील तरुणांच्या आशा आकांक्षा प्रफुल्लित करण्यासाठी पुढाकार घेतला ते रोहित पवार  त्यांचे सर्व सहकारी आणि बंधू-भगिनींनो..!

    एकदा असाच शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याची मांडणी आम्ही विधिमंडळात केली फारसे यश आले नाही, मग ठरवले नागपूरच्या अधिवेशनात शेतकरी दिंडी घेऊन जायची. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरला उन्हातान्हाचा विचार न करता आमचा वारकरी येतो, पांडुरंगाचे दर्शन घेतो आणि समाधानाने परत जातो. लोकशाहीची पंढरी ही विधिमंडळात असते आणि या पंढरीचे दर्शन घ्यावे आणि शेतकऱ्यांची मांडणी तेथे करावी हे आम्ही ठरवले आणि जळगावपासून नागपूरपर्यंत दिंडी काढली.


    रोहित पवारांची घसरली जीभ; तानाजी सावंतांना टार्गेट करताना महाराष्ट्र भिकारी होण्याची भाषा!!


    मला आठवते की, सामंजस्याने हजारोंच्या संख्येने या काळ्या आईची सेवा करणाऱ्यांनी सगळ्यांचे स्वागत केले. जेवणाची व्यवस्था कुठे नसायची पण कधी कमतरता पडली नाही. एखाद्या गावात पोहोचलो की, तेथील भगिनी दिंडी येणार म्हणून ट्रॅक्टरची ट्रॉली भरून भाकऱ्या तयार करायच्या, वांग्याचे भरीत करायच्या आणि खाऊ घालायच्या. एवढा मोठा प्रवास, परंतु कुठेही अन्नधान्याची व्यवस्था करावी लागली नाही.

    त्याहीपेक्षा मोठी दिंडी ही तुमची आहे. ५०० कि.मी. ही काही लहान सहान दिंडी नाही आणि एकंदरीत ४५ दिवस ही दिंडी चालेल, ही दिंडी नव्या पिढीची आहे, ही दिंडी नव्या पिढीला आत्मविश्वास देणारी आहे आणि ही दिंडी आजूबाजूच्या गावातल्या बंधू-भगिनींना आणि तरुणांना एक प्रकारची प्रोत्साहन देणारी आहे आणि म्हणून माझी खात्री आहे की, जे परिवर्तन करायचे जे निर्णय घेतले पाहिजे जो तुमचा आग्रह आहे त्याची प्रक्रिया या संघर्ष युवा मोर्चा मधून होईल. तुम्ही सुरुवात केली आणि लगेचच सरकारने कंत्राटी कामगारांचा निर्णय मागे घेतला अजून तर सुरुवात व्हायची आहे पण, तेवढ्यात हा निकाल झाला आणि तुम्ही ज्या वेळेस सुरुवात कराल, नागपूरला पोहोचाल तेव्हा माझी खात्री आहे की, सत्ताधाऱ्यांना सत्ता हातात ठेवायची असेल तर लोकशाहीच्या शांततेच्या मार्गाने ही यात्रा काढणाऱ्या तरुणांवर त्यांना दुर्लक्ष करता येणार नाही आणि जर दुर्लक्ष करण्याची भूमिका कोणी घेतली तर त्याची जबरदस्त किंमत ही सरकारला चुकवावी लागेल आणि म्हणून ही दिंडी ही यात्रा अत्यंत महत्वाची आहे.

    तुम्ही मोठा कार्यक्रम हातात घेतलाय, ज्याचा उल्लेख रोहितने व आधीच्या लोकांनी केला. सरकारच्या धोरणामध्ये काही गोष्टी समजू शकत नाही त्यांनी असे निर्णय का घेतले ? आता साधी गोष्ट आहे, शाळा चालू आहेत पण, शिक्षक नाहीत. शिक्षकांच्या २ लाख ५० हजार जागा रिक्त आहेत. यापेक्षा कितीतरी अधिक बेरोजगारांची संख्या आहे. म्हणून हा मुद्दा तुम्ही हातात घेतला, ही भरती झाली पाहिजे. शैक्षणिक संस्था चालतात चालवतात पण, काही लोक भरमसाठ फी घेतात. ही पद्धत योग्य नाही त्याचे शुल्क परत करण्याची भूमिका घेतली पाहिजे हा ही मुद्दा तुम्ही या ठिकाणी मांडलेला आहात. शिक्षक आणि प्राध्यापकांची रिक्त पद आहेत ती भरली पाहिजेत. भरती प्रक्रिया एमपीएससीच्या माध्यमातून करणे असे निकाल तुम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत.

    तुम्ही या ठिकाणी आणखी एक गोष्ट मांडली आणि माझ्या मते ती अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर व अमरावती अशी जी टू टायर शहरे आहेत त्या ठिकाणी आयटी क्षेत्राचा उल्लेख केला की, त्यांचा विकास केला पाहिजे.

    In Rohit Pawar’s Yuva Sangharsh Yatra, Pawar remembered his farmer Dindi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!