• Download App
    Pawar uncle-nephew पुण्यात काँग्रेसला बरोबर घेऊन पवार काका - पुतणे काँग्रेसचे बळ वाढविणार, की काँग्रेसची political space खाऊन टाकणार??

    पुण्यात काँग्रेसला बरोबर घेऊन पवार काका – पुतणे काँग्रेसचे बळ वाढविणार, की काँग्रेसची political space खाऊन टाकणार??

    नाशिक : अजित पवार पुण्यात चक्क महाविकास आघाडी बरोबर जाणार. पवार काका‌ – पुतणे काँग्रेसला बरोबर घेऊन एकत्र निवडणूक लढविणार, अशा बातम्या देऊन मराठी माध्यमांनी पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे राजकीय उत्सुकता वाढवून ठेवली. या बातम्यांना पवार काका – पुतण्यांच्या दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खतपाणी घातले. पण पवार काका – पुतण्या एकत्र येत असताना ते आपापल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आपापल्या पक्षांमध्ये टिकवून ठेवू शकले नाहीत, हे राजकीय सत्य मात्र मराठी माध्यमांनी नीटपणे समजावून सांगितले नाही.

    पवार काका – पुतण्या एकत्र येण्याच्या नुसत्या शक्यतेने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मधले मोठे कार्यकर्ते फुटले. त्यांनी इतरत्र थोडक्यात भाजपकडे जाणारे मार्ग शोधले. राहुल कलाटे आणि प्रशांत जगताप या दोघांनीही आपापले स्वतःचे मार्ग निवडले. कारण पवार काका – पुतण्यांच्या दोन्ही राष्ट्रवादीकडे आपापल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना काही “देण्यासारखे” उरले नाही.

    या पार्श्वभूमीवर पुण्यात पवार काका – पुतण्या एकत्र येऊन काँग्रेसला सुद्धा बरोबर घेणार असल्याची बातमी मराठी माध्यमांनी दिली. पुण्यातून महाविकास आघाडी पुनरुज्ज्वीत झाली, अशी मखलाशी सुद्धा केली.



    – कलमाडीनंतर नेतृत्व नाही, ही फार मोठी उणीव

    पण प्रत्यक्षात पवार काका पुतणे एकत्र येऊन पुण्यात काँग्रेसला बरोबर घेऊन काँग्रेसचे बळ वाढविणार की काँग्रेसची उरली सुरली political space खाऊन टाकणार??, या खऱ्या आणि कळीच्या सवालाचे उत्तर मराठी माध्यमांनी दिलेच नाही. वास्तविक पुण्यात काँग्रेस एकेकाळी सर्वत्र वर्चस्व टिकवून धरलेली पार्टी होती. काँग्रेस पक्ष पोखरूनच पवारांनी स्वतःची राष्ट्रवादी वाढविली. 2014 नंतर काँग्रेसला सगळीकडून फटके बसले, पण काँग्रेसची पुण्यातली संघटना मात्र फारशी विस्कळीत झाली नाही. काँग्रेसचे छोटे मोठे नेते आणि कार्यकर्ते पक्षातच टिकून राहिले. काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या घटली. आमदारांची संख्या कमकुवत झाली, पण मध्य पुण्यात काँग्रेसची ताकद बऱ्यापैकी टिकून राहिली. सुरेश कलमाडींच्या नंतर काँग्रेसला पुण्यात मोठा नेता उरला नाही, याची फार मोठी कोणी पक्षाला भासली, अन्यथा पुण्यात काँग्रेसची आज झाली एवढी वाताहत झाली नसती.

    – काँग्रेसला बरोबर घेणे ही पवारांची गरज

    तरी देखील पवार काका – पुतण्या काँग्रेसला बरोबर घेऊन आपापल्या पक्षांचे बळ वाढवतील पण काँग्रेसचे बळ कमीच करतील, हा आत्तापर्यंतच्या राजकीय अनुभवातून निष्कर्ष काढता येऊ शकेल. भाजपने अजित पवारांना महायुतीतून बाहेर ढकलले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद फुटीमुळे घटली. त्यांच्या पक्षाचे आमदार बापू पठारे यांच्या मुलाने भाजपची कास धरली. कारण पवारांच्या पक्षात त्याला काही “देण्यासारखे” उरले नव्हते. अशावेळी काँग्रेस सारख्या कार्यकर्त्यांचे बळ असलेल्या पक्षाला बरोबर घेणे ही काँग्रेसपेक्षा पवार काका पुतण्यांचे राजकीय गरज मोठी आहे. म्हणून पवार काका – पुतणे आज काँग्रेसला बरोबर घेऊन इच्छित आहेत.

    – पवार काँग्रेसची space खातील

    पुणे महापालिकेत काँग्रेस स्वतंत्रपणे लढली, तर स्वबळावर रेटून स्वतःची political space टिकविण्यात काँग्रेस यशस्वी होऊ शकेल. पण काँग्रेस पवार काका – पुतण्यांबरोबर गेली आणि महाविकास आघाडीतून त्या पक्षाने निवडणूक लढविली, तर मात्र काँग्रेसची political space संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे. कारण पवारांनी कुठला पक्ष वाढविल्याचे उदाहरण त्यांच्या राजकीय आयुष्यात आणि इतिहासात नाही, पण पवारांनी दुसरा पक्ष खाऊन टाकला किंवा संपविला ही उदाहरणे अनेक सापडतील.

    In Pune, the Pawar uncle-nephew duo will strengthen the Congress party by joining forces with them.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पवारांच्या राजकारणाची बालेकिल्ल्यात फलश्रुती; नाशिक मध्ये राष्ट्रवादीची भाजप मागे फरफट; पुण्यामध्ये काका – पुतण्यांना काँग्रेसची गरज!!

    सुप्रिया सुळेंना भाजपच्या मूळच्या कार्यकर्त्यांचा पुळका; पण स्वतःच्या पक्षात कार्यकर्ते टिकवता येईना!!

    Mumbai BMC Elections : द फोकस एक्सप्लेनर : मुंबईचा ‘किंग’ कोण? महायुतीचा विजयी धडाका विरुद्ध ठाकरेंची अस्तित्वाची लढाई! कुठे कुणाचे पारडे जड? वाचा सविस्तर