• Download App
    In Pune, the NCP MLA's program was delayed, then Minister of State Abdul Sattar left the forum

    पुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराचा कार्यक्रमाला उशीर, मग राज्यमंत्री अब्दुल सत्तारांनी सोडला मंच 

    स्वागतासाठी राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार अतुल बेनके वेळेवर न आल्याने अब्दुल सत्तार यांनी कार्यक्रमाच्या वेळी स्टेज सोडला.In Pune, the NCP MLA’s program was delayed, then Minister of State Abdul Sattar left the forum


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : महाविकास आघाडीचा धर्म पाळून जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचा सरपंच आणि शिवसेनेचा उपसरपंच असे शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ग्रामविकास आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना पुण्यातील पारगाव येथील नवीन ग्रामसंसद ग्राम पंचायत कार्यालय आणि शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित केले होते.

    परंतु स्वागतासाठी राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार अतुल बेनके वेळेवर न आल्याने अब्दुल सत्तार यांनी कार्यक्रमाच्या वेळी स्टेज सोडला.

    नेमकं काय घडलं?

    अब्दुल सत्तार हे ठरलेल्या वेळेनुसार जुन्नर तालुक्यात मु. पो. पारगाव या ठिकाणी उपस्थित राहिले होते.विचार केला तर तालुक्यात राज्याचे मंत्री महोदय जर येणार असतील तर प्रोटोकॉलप्रमाणे तालुक्यातील लोकप्रतिनिधी या नात्याने विद्यमान आमदाराला त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहायचे असते.



    परंतु राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांची स्वागतासाठी उपस्थिती लावणं, तर लांबच राहिलं, ते कार्यक्रमालाही वेळेत आले नाहीत.

    आमदार बेनकेंची आपण 20-30 मिनिटे वाट पाहू, तोवर शाखेचे उद्घाटन करुन आपण व्यासपीठावर प्रास्ताविक मनोगताला सुरुवात करु, आमदार आल्यानंतर नूतन ग्रामसंसद ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन करु, असं आवाहन अब्दुल सत्तार यांनी केलं होत.

    पुढे कार्यक्रमाला सुरुवात झाली तरीही आमदार अतुल बेनके वेळेवर आले नाहीत त्यामुळे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यानी कार्यक्रमादरम्यान स्टेज सोडून गेले .

    मात्र या घटने बददल स्थानिक शिवसेना कायकर्त्यांनी शिवसेनेच्या घोषणा देत आपली नाराजी व्यक्त केली. आता महाविकास आघाडीत याचे राजकीय पडसाद उमटणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

    In Pune, the NCP MLA’s program was delayed, then Minister of State Abdul Sattar left the forum

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस