होळी आणि धुलिवंदन निमित्त हडपसर परिसरातील अमानोरा माॅलमध्ये सनबर्न होली पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीत मोठ्या संख्येने तरुण -तरुणी सहभागी झाले होते. यावेळी 70 ते 80 मोबाईल चोरीला गेल्याची शक्यता असून अद्याप 21 तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत.
प्रतिनिधी
पुणे- होळी आणि धुलिवंदन निमित्त हडपसर परिसरातील अमानोरा माॅलमध्ये सनबर्न होली पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीत मोठ्या संख्येने तरुण -तरुणी सहभागी झाले होते. उच्च क्षमतेची ध्वनीवर्धक यंत्रणा वापरण्यात आली होती. या पार्टीत मद्यप्राशन करून बेधुंद नृत्य करणाऱ्या तरुणांकडील मोबाइल मोठ्या प्रमाणात लांबविण्यात आले.In Pune Hadapsar area Sunburn party organised but 70 to 80 mobile theft cases happened
मोबाइल चोरीच्या तक्रारी रात्री उशीरापर्यंत पोलिसांकडे येत होत्या. अद्याप 21 तक्रारी दाखल झाल्या आहेत. मात्र मोबाईल चोरीचा आकडा 80 ते 90 च्या घरात असण्याची शक्यता आहे. एका संशयिताला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली.
शुक्रवारी सकाळी अकरा ते दुपारी 4 पर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. खासगी इव्हेंट कंपनीकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सनबर्न होळी महोत्सव या नावाखाली हा कार्यक्रम भरविण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात जाहिरात करून या कार्यक्रमाची साडेतीन हजार रुपये पर्यंत तिकीट विक्री करण्यात आली होती.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात उच्चभ्रू तरुण तरुणी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. डीजेच्या तालावर मद्याच्या ठेक्यात थिरकत असताना चोरट्यांनी मोठ्याप्रमाणात मोबाईल चोरी केले. दोन हजारापेक्षा अधिक तरुण-तरुणी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
दरम्यान, माॅलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती सहभागी झाले होते. तेथे सुरक्षा व्यवस्था ठेवणे गरजेचे होते. करोनाच्या संसर्गामुळे जाहीर कार्यक्रमातील उपस्थितींबाबत काही नियमावली ठरवून देण्यात आली होती. पार्टीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगी घेण्यात आली होती. मात्र, उपस्थिती संख्या आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीमुळे आयोजकांवर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे गोकुळे यांनी सांगितले.
In Pune Hadapsar area Sunburn party organised but 70 to 80 mobile theft cases happened
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले लोकमान्यता असलेले जगातील पहिल्या क्रमांकाचे नेते
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना विषप्रयोगाची भीती, हजारांवर वैयक्तिक कर्मचाऱ्याना नोकरीवरून टाकले काढून
- बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांचा अजब तर्क, द काश्मीर फाईल्स चित्रपटाशी दहशतवाद्यांचे कनेक्शन
- अमनोरा येथे होळीच्या पार्टीत २१ मोबाईल चोरीला हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल