• Download App
    पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्याची भर दिवसा ६ गोळ्या झाडून केली हत्याIn Pune, a Congress worker was killed by firing 6 bullets a day

    पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्याची भर दिवसा ६ गोळ्या झाडून केली हत्या

    समीर मनूर यांची काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती.In Pune, a Congress worker was killed by firing 6 bullets a day


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुण्यात आज भर दिवसा एका कॉंग्रेस कार्यकर्त्याची ६ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.समीर मणूर (वय ४०)असं मृत व्यक्तीच नाव आहे.पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात चंद्रभाग चौकात ही घटना घडली आहे. घटना घडल्याचे समजताच विद्यापीठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.



    या घटनेची तातडीने दखल घेत विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे. मृत समीर चौकात उभा होता. दरम्यान दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी समीरच्या खूप जवळ येऊन त्याच्यावर गोळीबार केला. समीर वर सहा गोळ्या झाडण्यात आल्या.

    या गोळाबारात समीर गंभीर जखमी झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.समीर मनूर यांची काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती.

    In Pune, a Congress worker was killed by firing 6 bullets a day

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!