• Download App
    पुण्यात घडली मन हेलावून टाकणारी घटना , प्रेयसीच्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून फेकले मुठा घाटात , 40 वर्षीय प्रियकराला अटकin Pune 40-year-old boyfriend arrested for killing girlfriend

    पुण्यात घडली मन हेलावून टाकणारी घटना , प्रेयसीच्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून फेकले मुठा घाटात , 40 वर्षीय प्रियकराला अटक

    तब्बल बारा दिवसांनंतर हत्येचा प्रकार उघडकीस आला. तीस वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी 40 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. in Pune, 40-year-old boyfriend arrested for killing girlfriend


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : प्रेमात प्रियसी-प्रियकराची हत्या,आत्महत्येच्या बर्‍याच घटना घडत आहेत.अशीच एक धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.पुण्यात एका प्रियकराने प्रेयसीच्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे पोत्यात भरुन फेकले.

    दरम्यान प्रियकराला पुण्यात अटक करण्यात आली आहे. तब्बल बारा दिवसांनंतर हत्येचा प्रकार उघडकीस आला. तीस वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी 40 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.



    नेमकं काय आहे प्रकरण ?

    हनुमंत अशोक शिंदे (वय 40 वर्ष, रा. बुधवार पेठ)  अटक अस आरोपीच नाव आहे. रोजिना रियाज पानसरे उर्फ कविता चौधरी (वय 30 वर्ष, रा. बुधवार पेठ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. हनुमंतने प्रेयसीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. त्यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे पोत्यात भरुन पिरंगुट आणि मुठा घाटात फेकून दिले होते.

    ही घटना 12 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास नारायण पेठ परिसरात घडली होती. तब्बल 12 दिवसांनी खुनाचा प्रकार उघडकीस आला. प्रियकराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. प्रेयसीकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिंदे याने हे कृत्य केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

     in Pune 40-year-old boyfriend arrested for killing girlfriend

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस