• Download App
    पिंपरीमध्ये भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकले|In Pimpri, a petrol bomb was hurled at the office of BJP MLA Laxman Jagtap's brother

    पिंपरीमध्ये भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकले

    वृत्तसंस्था

    पिंपरी चिंचवड : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर दुचाकीस्वारांनी पेट्रोल बॉम्ब फेकल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे.In Pimpri, a petrol bomb was hurled at the office of BJP MLA Laxman Jagtap’s brother

    आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या कार्यालयाच्या दिशेने अज्ञात दुचाकीस्वाराने पेट्रोल बॉम्ब फेकला आहे.शंकर जगताप यांचे चंद्ररंग हे कार्यालय आहे. एका दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांनी कार्यालयाच्या दोन पेट्रोल बॉम्ब फेकले होते.



     

    त्या पैकी एक कार्यलयाच्या बाजूला असलेल्या रोहित्रावर आदळला. सांगवी पोलिसांना हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथक रवाना केले आहेत. दरम्यान, हा हल्ला कुणी आणि कोणत्या उद्देशाने केला हे अजून स्पष्ट झाले नाही. त्यामुळे तर्कवितर्काना उधाण आले आहे.

    In Pimpri, a petrol bomb was hurled at the office of BJP MLA Laxman Jagtap’s brother

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस