- राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी
प्रतिनिधी
मुंबई : बोगस विद्यार्थी पटसंख्या रोखण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शाळेत प्रवेश घेताना आता विद्यार्थ्यांसोबत पालकांचे आधार कार्ड सुद्धा सबमिट करणे सक्तीचे असून पालकांचे आधार कार्ड विद्यार्थ्यांसोबत लिंक केले जाणार आहे. बीड जिल्ह्यातील बोगस पटसंख्येच्या प्रकारानंतर राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीचा अहवाल स्वीकारून राज्य सरकारने शाळांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. In Maharashtra to prevent bogus numbersAadhaar card compulsory for students – parents for school admission
शाळांमध्ये आधारकार्ड सक्ती
बनावट पटसंख्या दाखवत अनेक शाळा कोट्यावधी रुपयांचे सरकारी अनुदान लाटत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यावर आता यापुढे शाळेत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांसह पालकांनाही आधारकार्ड जोडणे सक्तीचे करण्यात आले आहे. २७ जानेवारीला राज्य सराकारने हा निर्णय घेतला आहे.
शाळा प्रवेशाबाबत नव्या सूचना
- विद्यार्थ्यांचे प्रवेश आधारकार्डांशी जोडण्यात यावेत.
- प्रवेश अर्जासोबत पालकांचे सुद्धा आधार कार्ड सादर करण्यात यावे.
- शाळा व्यवस्थापन समिती ही प्रवेश देखरेख समिती म्हणून काम करेल.
- शाळांनी पालकांकडून दोन प्रतींमध्ये अर्ज भरून घ्यावा. प्रवेश अर्जावर पालकांची स्वाक्षरी आवश्यक आहे.
- प्रवेश अर्जावर पालक आणि विद्यार्थ्यांचे फोटो लावणे आवश्यक आहे.
- प्रवेश अर्जाची एक प्रत केंद्र प्रमुखास देण्यात यावी.
- दोन वेळा विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करावी. यात दुरूपयोग आढळून आल्यास पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करावा.
- पालक आधार कार्ड सादर करू शकले नाही, तर अटीच्या अधीन राहून विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश द्यावा. पण आधारकार्ड सादर करणे अनिवार्य करावे.
In Maharashtra to prevent bogus numbersAadhaar card compulsory for students – parents for school admission
महत्वाच्या बातम्या