• Download App
    महाराष्ट्रात शिवीगाळीनंतर गाजू लागलेय सोय – सुपारी – चांदीचे ताट…!!In Maharashtra, after abusing, there is a lot of facilities - betel nut - silver plate

    Thackeray – Sule : महाराष्ट्रात शिवीगाळीनंतर गाजू लागलेय सोय – सुपारी – चांदीचे ताट…!!

    महाराष्ट्रात सध्या चैत्री जत्रा – यात्रांचा हंगाम जोरदार सुरू असताना सगळीकडे तमाशाच्या सुपाऱ्या देण्याघेण्यात येत आहेत… जत्रेतली नैवेद्याची जेवणे होत आहेत… त्याच वेळी राजकीय हंगामात आता सोय – सुपारी आणि चांदीचे ताट गाजू लागले आहे. In Maharashtra, after abusing, there is a lot of facilities – betel nut – silver plate

    मध्यंतरी महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर म्यांव – म्यांव गाजले. कोंबडा – कोंबडी गाजले. महाराष्ट्राचे राजकारण माणसे चालवतात की प्राणी… असा प्रश्न तयार होत असतानाच च्युत्या, येडझवा असे शेलके शब्द गाजून महाराष्ट्राचे राजकारण माणसेच चालवतात… पण शिवराळ, असाही साक्षात्कार झाला…

    आता त्यापुढे जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणाच सोय – सुपारी – चांदीचे ताट हे शेलके शब्द गाजू लागले आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी आवाज टाकल्याबरोबर ते चर्चेत आले. पवारांनी ते अदखलपात्र आहेत, असे सांगूनही महाराष्ट्राच्या ठाकरे – पवार सरकारने त्यांची दखल घेतली. पण त्याच बरोबर त्यांचे बाळासाहेबांसारखे भगवी शाल पांघरलेले फोटो फेमस व्हायला लागल्या बरोबर शिवसेनेचे राजकीय कान उभे राहिले.

    शिवसेनेने लगेच राज ठाकरे यांना सोयीनुसार आणि सुपारीनुसार हिंदुत्ववादी ठरवून टाकले. त्याची पोस्टर्स पुण्यात लावली. राज ठाकरे यांनीच काढलेले व्यंगचित्र त्यांच्याच अंगावर घातले. त्यांच्याच व्यंगचित्रांची पोस्टर्स लावून राज यांचीच खिल्ली उडवली.

    एकीकडे महाराष्ट्रातल्या राजकारणात राज ठाकरे यांची चर्चा होत असताना खासदार सुप्रिया सुळे संभाजीनगरात (राष्ट्रवादीच्या औरंगाबादेत) एकदम खरे बोलून गेल्या… समोर चांदीचे ताट जेवायला ठेवले आहे, पण तुम्हाला खाता येत नाही, अशा शब्दात त्यांनी आपल्याच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुनावले. औरंगाबादेत हडकोत राष्ट्रवादीने भले मोठे भवन बांधून ठेवले आहे. पण कोणी पदाधिकारी तिथे फिरकत नाहीत. लोकांच्या समस्या सोडवत नाहीत. राष्ट्रवादी भवन औरंगाबाद शहरापासून लांब आहेत, असे म्हणतात, पण बिर्याणी खायला २० – २० किलोमीटर लांब जातात, अशा शब्दांत सुप्रिया ताईंनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे वाभाडे काढले…!!

    पण आम्हाला ना चांदीचे ताट दिसले, ना त्यातले अन्न असे सांगत सत्तेचा लाभ काही लोकांनाच झाला, सामान्य कार्यकर्त्यांना नाही, असे म्हणत सुप्रिया ताईंवरच ते वाभाडे उलटवले… बाकी सुप्रिया ताई खरेच बोलल्या… जनमताचा कौल नसताना राष्ट्रवादीला सत्तेचा लाभ झाला, हे चांदीचे ताट नाही का… जे पवार साहेबांनी आणि उध्दव साहेबांनी मिळवून दिले…!! सुप्रिया ताईंच्या तोंडून सत्य बाहेर आले… पण त्याही पेक्षा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या तोंडून कटू सत्य बाहेर आले… हेही नसे थोडके….!!

    In Maharashtra, after abusing, there is a lot of facilities – betel nut – silver plate

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस