• Download App
    ए पासून झेड पर्यंत कुठलेही व्होटर सर्व्हे येवोत, महाराष्ट्रात महायुती 40 पार जाणारच; देवेंद्र फडणवीसांचा विश्वास In maharashtra a to z survey voter won only NDA

    ए पासून झेड पर्यंत कुठलेही व्होटर सर्व्हे येवोत, महाराष्ट्रात महायुती 40 पार जाणारच; देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : ए पासून झेड पर्यंत कुठलेही सर्व्हे येवोत, महाराष्ट्रात भाजप महायुती 40 पार जाणारच, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात व्यक्त केला. In maharashtra a to z survey voter won only NDA

    लोकसभा निवडणुकीत एबीपी माझा आणि सी व्होटरच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला 26 आणि महायुतीला 21 जागा मिळण्याचे भाकीत वर्तविण्यात आले. या मुद्द्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर फडणवीसांनी परखड शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले.

    मी प्रत्येक सर्वेक्षणाचा सन्मान करतो. पण ए व्होटर येऊ द्या, बी व्होटर येऊ द्या, सी व्होटर येऊ द्या, अगदी झेड पर्यंत कोणतेही व्होटर सर्व्हे येऊ द्यात, कुठलेही सर्व्हे आले, तरी देशातल्या जनतेने मोदींनाच मतदान करायचे ठरवले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महायुती 40 पार जाईलच, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

    या सगळ्या सर्वेक्षणावर शरद पवार अजित पवार, हसन मुश्रीफ या नेत्यांनी देखील सावध प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

    In maharashtra a to z survey voter won only NDA

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!