विशेष प्रतिनिधी
पिंपरी : मुंबईला जाणाऱ्या कारचा दोन मोठ्या वाहनांच्या मध्ये चेंदामेंदा झाला. त्यामुळे चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर खंडाळा घाटात आज पहाटे हा भीषण अपघात झाला. एकूण सहा वाहनांची धडक होत हा अपघात झाला. अपघातात अन्य वाहनांमधील तीन जण गंभीर तर पाच जण किरकोळ जखमी झाले. In Khandala Ghat, a car collided with two large vehicles; 4 killed
दोन कंटेनर, दोन कार, टेम्पो व ट्रक अशा सहा वाहनांचा हा अपघात आहे. सर्व वाहने मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला आहे.
घटनेची माहिती समजताच बोरघाट व खोपोली पोलीस यांच्यासह आयआरबी, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हाॅस्पिटलची यंत्रणा, अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत व जखमी यांना वाहनांमधून बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात दाखल केले.