कौटुंबिक वादाच्या कारणातून जावयाने सासर्याचा चाकूने सपासप वार करून खून केल्यानंतर चाकू हातात घेऊन थेट पोलिस ठाणे गाठले. त्याने खून केल्याची माहिती देताच पोलिसांची देखील भंबेरी उडाली.In khadkhi market one shopkeeper murder by his realative because family matter reason
विशेष प्रतिनिधी
पुणे -कौटुंबिक वादाच्या कारणातून जावयाने सासर्याचा चाकूने सपासप वार करून खून केल्यानंतर चाकू हातात घेऊन थेट पोलिस ठाणे गाठले. त्याने खून केल्याची माहिती देताच पोलिसांची देखील भंबेरी उडाली. रमेश रामचंद्र उत्तरकर (वय.65,रा. आकाशदिप सोसायटी खडकी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.In khadkhi market one shopkeeper murder by his realative because family matter reason
याप्रकरणी खडकी पोलिसांनी अशोक गुलाब कुडले (वय.38,रा. खडकी बाजार) याला ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी साडेसात वाजताच्या सुमारास खडकी बाजार बस थांब्याच्या डाव्या बाजूला असलेल्या एका कपड्याच्या दुकानात घडली आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुडले व खून झालेली व्यक्ती उत्तरकर यांच्यात सासरे वा जावयाचे नाते आहे. 2019 पासून कुडले व त्याच्या पत्नीचा कौटुंबिक कारणातून वाद सुरू आहे. तेव्हापासून दोगे वेगळे राहतात. कुडले हा त्याच्या आईसोबत राहतो. तर त्याची पत्नी तिच्या वडिलांकडे राहते. दोघांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले आहेत. उत्तरकर यांची दोन दुकाने असून ती त्यांनी भाड्याने दिली आहेत.
तर जावई कुडले हा वडापावची गाडी चालवतो. दोघांचा वाद न्यायालयात सुरू आहे. कुडले हा पत्नीला नांदायला पाठवा असे सांगत होता. तर सासरे घटस्फोट घेण्याचे सांगत होते. त्यातून दोघांत वाद सुरू होते. बुधवारी कोर्टात तारीख होती. तारीख झाल्यानंतर कुडले व उत्तरकर यांच्यात वाद झाले. उत्तरकर सायंकाळी साडे सातच्या सुमारास स्टुल टाकून कपड्याच्या दुकानात बसले होते.
त्यावेळी कुडले याने तेथे येऊन धारधार चाकूने त्यांच्यावर सपासप वार केले. सहा ते सात वार झाल्याने उत्तरकर हे गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाले. त्यानंतर कुडले हा चाकू हातात घेऊन स्वतः खडकी पोलिस ठाण्यात हजर झाला. घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली त्यावेळी उत्तरकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. उत्तरकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णलयात पाठविण्यात आला होता. पुढील तपास खडकी पोलिस करत आहेत.
In khadkhi market one shopkeeper murder by his realative because family matter reason
महत्त्वाच्या बातम्या
- जहांगीरपुरी बुलडोझर प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात उद्या महत्त्वाची सुनावणी, दोन न्यायाधीशांचा खंडपीठात समावेश
- लाऊडस्पीकरच्या वादावर मुंबई पोलिसांची कठोर भूमिका, जाणून घ्या नियम न पाळल्यास काय होणार कारवाई
- जॉन्सन भेटीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची प्रतिमा बिघडविण्यासाठीच धार्मिक हिंसाचार, भाजपचा आरोप
- फेसबुकवरूनही लव्ह जिहाद, प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणासह नातेवाईकांचाही सामूहिक बलात्कार