उधार दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून एका तरुणाचा कुऱ्हाडीने डोक्यावर सपासप वार करत खून करण्यात आला. ही घटना फुरसुंगीतील पापडेवस्ती येथील धनराज डेअरी येथे घडली.
विशेष प्रतिनिधी
पुणे – उधार दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून एका तरुणाचा कुऱ्हाडीने डोक्यावर सपासप वार करत खून करण्यात आला. ही घटना फुरसुंगीतील पापडेवस्ती येथील धनराज डेअरी येथे घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.In Hadapsar area Loan money conflict reason one youth murder outside his house
युवराज बाबुराव जाधव (34) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे वडिल बाबुराव माणिक जाधव(55) यांनी फिर्याद दिली आहे. तर गणेश सुरेश खरात (35,रा.पापडे वस्ती, फुरसुंगी) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी यांची दुध डेअरी आहे. त्यांचा मुलगा त्यांना व्यवसायात मदत करतो. तर आरोपी गणेश हा मिळेल तशी मोलमजुरीची कामे करतो. त्याने फिर्यादीचा मुलगा युवराज याच्याकडून 20 हजार रुपये हात उसणे घेतले होते. युवराज हा गणेशकडे सातत्याने हात उसणे दिलेले पैसे मागत होता.
रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गणेश हा युवराज याच्या घराबाहेर आला होता. तेव्हा युवराजने पुन्हा एकदा गणेशकडे पैशासाठी तगादा लावला. याचा राग आल्याने गणेशने जवळील कुऱ्हाडीने युवराजच्या डोक्यावर सपासप वार केले. युवराजच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, मानेवर आणि तोंडावर गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक खरात तपास करत आहेत.
In Hadapsar area Loan money conflict reason one youth murder outside his house
महत्त्वाच्या बातम्या
- Sanjay Raut ED Action : दादरचा फ्लॅट आणि किहीम बीच जवळील जमीन जप्त!!; वाचा आणखी तपशील…!!
- Sanjay Raut ED Action : गोरेगावच्या 1034 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊतांच्या संपत्ती जप्तीची ईडी कारवाई!! वाचा सविस्तर…!!
- Sanjay Raut ED Action : संपत्ती जप्त नंतर संजय राऊत ईडी – भाजपवर भडकले; किरीट सोमय्या यांना अश्लील भाषेत टीका!!
- लोणावळ्यातील काँग्रेसच्या नगरसेवकाने खरेदी केली; कुख्यात डॉन इक्बाल मिर्ची याची हवेली