• Download App
    गोव्यात पेट्रोल १२ रुपये तर डिझेल १७ रुपयांनी स्वस्त; वॅट करात कपात केल्यामुळे झाले स्वस्त । In Goa, petrol is cheaper by Rs 12 and diesel by Rs 17; The reduction in VAT has made it cheaper

    गोव्यात पेट्रोल १२ रुपये तर डिझेल १७ रुपयांनी स्वस्त; वॅट करात कपात केल्यामुळे झाले स्वस्त

    वृत्तसंस्था

    पणजी : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे पाच आणि दहा रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यांनीही त्यांच्या वॅट करात कपात करण्याचे आवाहन केंद्राने केले होते. त्याला प्रतिसाद देत गोव्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अतिरिक्त सात रुपयांची कपात केली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हा निर्णय जाहीर केला.  In Goa, petrol is cheaper by Rs 12 and diesel by Rs 17; The reduction in VAT has made it cheaper



    गोवा सरकारच्या या निर्णयामुळे गोव्यात आता पेट्रोल १२ रुपयाने आणि डिझेल १७ रुपयांनी स्वस्त झालं आहे. इंधनाचे दरात कपात करुन पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला दिवाळी भेट दिल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संदेशात म्हटलं आहे. त्यामुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत गोवा सरकार पेट्रोलच्या दरात अतिरिक्त सात रुपये आणि डिझेलच्या दरात अतिरिक्त सात रुपये कपात करत असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केलं.

    In Goa, petrol is cheaper by Rs 12 and diesel by Rs 17; The reduction in VAT has made it cheaper

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस