विशेष प्रतिनिधी
अमरावती : शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असून शहरात पाहिजे त्या प्रमाणात स्वच्छता नाही. अमरावती पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे डेंगू मलेरियाचे आजार पसरत आहेत, असा आरोप करत आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर एक ट्रक कचरा नेऊन टाकला. In front of Amravati Municipality Dumped a truck garbage
येत्या ८ दिवसात अमरावती शहर पूर्ण स्वच्छ करावे. अन्यथा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घर समोर कचरा टाकला जाईल, असा गंभीर इशारा दिला आहे.
- आमदार रवी राणा समर्थकांची आक्रमक भूमिका
- महानगरपालिकेसमोर एक ट्रक कचरा नेऊन टाकला
- अस्वच्छतेमुळे डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढला
- नगरसेवक, अधिकारी, ठेकेदार घाणीला जबाबदार
- ८ दिवसात अमरावती शहर पूर्ण स्वच्छ करावे
- अन्यथा अधिकाऱ्यांच्या घरासमोर कचरा टाकणार