• Download App
    पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या बचावात वडील खासदार सुनील तटकरे; शिवसेनेच्या मंत्र्याकडे दाखवले बोट!! In defense of Guardian Minister Aditi Tatkare, elder MP Sunil Tatkare

    पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या बचावात वडील खासदार सुनील तटकरे; शिवसेनेच्या मंत्र्याकडे दाखवले बोट!!

    प्रतिनिधी

    रायगड : महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारमधील राज्यमंत्री आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात शिवसेनेचे तीन आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी रणशिंग फुंकल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधला रायगड जिल्ह्यातल्या राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे.In defense of Guardian Minister Aditi Tatkare, elder MP Sunil Tatkare

    या पार्श्वभूमीवर आदिती तटकरे यांच्या बचावात खुद्द त्यांचे वडील खासदार सुनील तटकरे यांना उतरावे लागले आहे. सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातल्या राजकीय संघर्षात शिवसेनेच्या वरिष्ठ मंत्र्यांचा हात दिसतो आहे, असा आरोप करून शिवसेना नेतृत्वाला डिवचले आहे. मात्र, त्यांनी शिवसेना मंत्र्याचे नाव घेतलेले नाही.

    शिवसेना आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी, आणि महेंद्र थोरवे यांनी गेल्या काही दिवसांपासून आदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून हटवण्याची मागणी लावून धरली आहे. रायगड जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या आमदारांची कामे आदिती तटकरे करत नाहीत. कामांमध्ये अडथळा आणतात. त्याचबरोबर निधी वाटपात शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय झाल्याची तक्रार त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.



    या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कुठलाही “वेगळा” निर्णय घेऊ नये, यासाठी अखेरीस आदिती तटकरे यांचे वडील खासदार सुनील तटकरे हे मैदानात उतरले आहेत आणि त्यांनी आदिती तटकरे यांचा बचावाचा प्रयत्न केला आहे. शिवसेना आमदारांना निधी कमी दिला जात नाही. शिवाय शिवसेनेच्या तीनही आमदारांचे आपले अतिशय सौहार्दाचे आणि चांगले संबंध आहेत. परंतु रायगड जिल्ह्यातील शिवसेना राष्ट्रवादी संघर्षामागे आघाडी सरकारमधील कोण शिवसेनेच्या वरिष्ठ मंत्र्यांचा हात दिसतो आहे, असा संशय सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

    सुनील तटकरे यांच्या विधानावर शिवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण तटकरे यांचे हे वक्तव्य नेमके कोणत्या मंत्र्याच्या दिशेने आहे? रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंत्र्याच्या दिशेने आहे की ठाणे जिल्ह्यातल्या मंत्र्याच्या दिशेने आहे?, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर सुनील तटकरे यांच्या विधानातून त्यांना रायगड जिल्ह्यातला शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातला संघर्ष मिटवायचा आहे की वाढवायचा आहे?, असा सवालही करण्यात येत आहे.

    In defense of Guardian Minister Aditi Tatkare, elder MP Sunil Tatkare

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ