• Download App
    व्यवसायिकाच्या खात्यावरुन भामटयाने काढले परस्पर ऑनलाईन कर्ज - सहा लाखांच्या फसवणुकी प्रकरणी भामटावर गुन्हा दाखल|In Cyber fraud case businessman cheated six lakhs rupees for KYC update reason

    व्यवसायिकाच्या खात्यावरुन भामटयाने काढले परस्पर ऑनलाईन कर्ज – सहा लाखांच्या फसवणुकी प्रकरणी भामटावर गुन्हा दाखल

    सायबर गुन्हेगारीचे स्वरुप दिवसेंदिवस बदलत असून चिखली परिसरात रहाणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिक असलेल्या व्यवसायिकाचे बँक खात्यावरुन अनाेळखी भामटयाने परस्पर पाच लाख रुपयांचे कर्ज काढले आहे. तर केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ९० हजार रुपये काढून घेत आर्थिक फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे –सायबर गुन्हेगारीचे स्वरुप दिवसेंदिवस बदलत असून चिखली परिसरात रहाणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिक असलेल्या व्यवसायिकाचे बँक खात्यावरुन अनाेळखी भामटयाने परस्पर पाच लाख रुपयांचे कर्ज काढले आहे. तर केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ९० हजार रुपये काढून घेत आर्थिक फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.In Cyber fraud case businessman cheated six lakhs rupees for KYC update reason

    याप्रकरणी चिखली पाेलीस ठाण्यात एसीबीआय बँकेच्या सहा वेगवेगळया खातेधारक व अनाेळखी इसमा विराेधात फसवणुक व आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुरलीधर चंद्रशेखर रानडे (वय-६३) यांनी पाेलीसांकडे फिर्याद दिली आहे. मुरलीधर रानडे यांना राहते घरी असताना एका अनाेळखी माेबाईल क्रमांकावरुन फाेन आला व संबंधित ससमाने तुम्हाला केवायसी अपडेट करावा लागेल



    असे सांगत मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार तक्रारदार यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याने सांगितल्याप्रमाणे प्ले स्टाेअर मधुन क्वीक स्पाेर्ट हे ॲप डाऊनलाेड केल्यानंतर त्यावर आलेला सहा अंकी क्रमांक त्या अज्ञात इसमाला पाठविला. त्यानंतर रानडे यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चिंचवड,पुणे या बँक खात्यावरुन ९० हजार रुपये नेट बँकिंग एटीएम याेनाे कॅशने काढले.

    तसेच वेगवेगळया खाते नंबरवर सदर रक्कम ट्रान्सफर करण्यात आली. त्याचप्रमाणे रानडे यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन परस्पर पाच लाख रुपयांचे कर्ज काढून ती रक्कम ही वेगेगळया खात्यावर ट्रान्सफर करुन घेऊन पाच लाख ९० हजार रुपयांची फसवणुक केली अाहे. याबाबत संबंधित आराेपींनी परस्पर पाच लाखांचे ऑनलाईन कशाप्रकारे कर्ज काढले याबाबतची माहिती गाेळा करण्यात येत असल्याची माहिती तपास अधिकारी एस.बर्गे यांनी दिली आहे.

    In Cyber fraud case businessman cheated six lakhs rupees for KYC update reason

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!