• Download App
    अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात तटकरेंनी उकरली राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री न झाल्याची जुनी जखम!!|In Ajit Dada's NCP anniversary program, Tatkare raised the old wound of NCP's failure to become Chief Minister!!

    अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात तटकरेंनी उकरली राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री न झाल्याची जुनी जखम!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सतत सत्तेच्या वळचणीला बसण्याची सवय लागलेल्या पक्षाला अजून मुख्यमंत्री करता आला नाही, याची सल आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतरही नेत्यांच्या मनात कायम आहे. किंबहुना ही जखम जास्तीत जास्त खोलवर घुसत चालली आहे. याचेच अत्यंत अजित पवारांच्या आजच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात आले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवारांनी अजित पवारांना किंवा राष्ट्रवादीच्या दुसऱ्या कुठल्या नेत्याला मुख्यमंत्री केले नसल्याची जखम उकरून काढली.In Ajit Dada’s NCP anniversary program, Tatkare raised the old wound of NCP’s failure to become Chief Minister!!



    पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला 25 वर्षे झाल्यानंतर शरद पवारांना किंवा अजित पवारांना स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता का स्थापन करता येऊ शकली नाही??, हा सवाल मात्र कुणी सुनील तटकरे यांना केला नाही आणि त्याचे उत्तरही त्यांनी दिले नाही, तर सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली.

    सुनील तटकरे म्हणाले :

    तुम्हाला फक्त 7 वर्षांचा अनुभव होता तरी तुम्ही मुख्यमंत्री झालात, मग अजितदादांनाही 7 वर्षांचा अनुभव असताना त्यांना मुख्यमंत्रिपद का नाकारलं??

    25 वर्षांपासूनचा संघर्ष पाहातोय.  स्वाभिमानाच्या मुद्यावर लढलो. शिवाय त्या कालावधीमध्ये परकिय नागरिकाचा मुद्दाही त्या कालावधीमध्ये होता. राजकारणामध्ये अनेकदा भूमिका बदलावी लागते. परंतु घेतलेल्या भूमिकेत देखील बदल करावा लागतो. हे पक्षाच्या स्थापनेनंतर काही कालावधी लक्षात आलं. ज्या पक्षापासून फारकत घेतली, विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्र लढल्या. शिवसेना, भाजपने केली नसेल तेवढी टीका त्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केली. त्यावेळी निवडणुकीचे निकाल संमिश्र लागले होते. आजच काही अघटीत घडल्यासारखे काही बालमंडळी सांगतात.

    अजितदादा तुमचा स्तुतीपाठक त्यावेळी नव्हतो आणि आताही नाही. मात्र तुम्ही पायाला भिंगरी बांधून संघटना बांधली. भुजबळ यांना जर मुख्यमंत्री केलं असत तर पक्ष फुटला असता असं सांगितले. नेतृत्वाने ही भूमिका घेतली होती. ⁠सर्वात जास्त मत त्यावेळी भुजबळ यांना पडली होती. आम्हाला त्यावेळी मुख्यमंत्रिपद घ्यायचं नव्हतं, मात्र प्रफुल भाई तुम्हाला ही घ्यायचं नव्हतं असा समज होता.

    दादा तुम्ही राज्यमंत्री असताना तुमची माझी भेट झाली. त्यावेळी मला जाणवल की वेगळं रसायन आहे. पवार साहेब ही 72 व्या वर्षी केंद्रात मंत्री झाले. त्यावेळी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपदाची संधी आली होती ती जर घेतली असती तर पक्षाला मागे वळून बघायची गरज वाटली नसती. 2014 मध्ये बाहेरुन पाठिंबा दिला होता. 2009 साली ही भाजप सोबत जाण्यासाठी प्रत्येकी 16 जागांचा फॉम्युला ठरला होता.

    पण पवारांनी सतत बदलती भूमिका घेतली त्यामुळे आम्हालाच विश्वासघात झाला असे वाटायला लागले म्हणून आम्ही भाजपबरोबर गेलो.

    In Ajit Dada’s NCP anniversary program, Tatkare raised the old wound of NCP’s failure to become Chief Minister!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस