• Download App
    Imtiaz Jalil इम्तियाज जलील यांचे निवडणुक आयोगाला पत्र

    Imtiaz Jalil : इम्तियाज जलील यांचे निवडणुक आयोगाला पत्र; मुस्लिम मताचा टक्का घसरला, मतदान प्रक्रिया संथगतीने झाल्याची तक्रार

    Imtiaz Jalil

    विशेष प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर : Imtiaz Jalil  एमआयएमचे माजी खासदार व प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (  Imtiaz Jalil  ) यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. लोकसभेला संथगतीने मतदान झाल्याने मुस्लिम मताचा टक्का घसरला असल्याचे त्यांनी या पत्रातून निदर्शनास आणून दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तातडीने पावले उचलण्यात यावी, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी या पत्राद्वारे केली आहे.Imtiaz Jalil

    लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांचा पराभव झाला होता. मतदानाच्या दिवशी मुस्लिम बहुल भागात मतदानाची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. मतदानाला वेळ लागत असल्याने संभाजीनगरच्या मुस्लिम बहुल भागात मोठ्या रांगा लागल्या होत्या. तसेच अनेकजण मतदान न करताच माघारी फिरले असल्याच्या तक्रारी यापूर्वी करण्यात आल्या होत्या मात्र याचा काहीच फायदा झाला नसल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे.



    इम्तियाज जलील म्हणाले या संथ कारभारामुळे याचा परिणाम मुस्लिम मतांवर झाला व मुस्लिम मतांचा टक्का घसरला. लोकसभेला झालेली चूक येत्या विधानसभेत होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने योग्य ती खबरदारी घेऊन, मतदान प्रक्रिया वेगाने कशी घेता येईल यावर विचार करावा, असे आवाहन इम्तियाज जलील यांनी केले आहे.

    पुढे बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, यासाठी सर्व पातळीवर भारतीय निवडणूक आयोगाने ‘टर्निंग १८’ आणि ‘यू आर द वन’ या सारख्या अभियानांच्या माध्यमातून नागरिकांनी सहभाग घ्यावा यासाठी प्रोत्साहित केले होते. एकीकडे मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी प्रयत्न तर दुसरीकडे प्रक्रिया संथगतीने असा विरोधाभास दिसला, असे इम्तियाज जलील यांनी पत्रात नमूद केले आहे.

    Imtiaz Jalil’s letter to Election Commission; Muslim vote share drops, complaint of slow voting process

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस