• Download App
    Imtiaz Jaleel Crores Property; Vanchit Bahujan Aghadi Questions ​​​​​​​इम्तियाज जलील यांच्याकडे कोट्यवधींची

    Imtiaz Jaleel : ​​​​​​​इम्तियाज जलील यांच्याकडे कोट्यवधींची प्रॉपर्टी कुठून आली? वंचित बहुजन आघाडीचा सवाल

    Imtiaz Jaleel

    विशेष प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर: Imtiaz Jaleel  एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नुकतेच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर मालमत्तेसंबंधी गंभीर आरोप केले होते. आता याला प्रत्युत्तर म्हणून वंचित बहुजन आघाडीने खुद्द जलील यांच्यावरच कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवल्याचा आरोप केला आहे. वंचितचे स्थानिक पदाधिकारी अफसर खान यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “इम्तियाज जलील ५ वर्षे खासदार आणि ५ वर्षे आमदार होते. या १० वर्षांत त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी कुठून आली?”Imtiaz Jaleel

    अफसर खान यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, इम्तियाज जलील यांनी आपल्या पत्नीच्या नावावर खुलताबाद येथे १ कोटी रुपयांची मालमत्ता घेतली आहे. विशेषतः, ते पूर्वी राहत असलेले ‘मन्नत क्रमांक एक’ हे घर कोट्यवधी रुपयांचे असताना, त्यांनी ते केवळ ९५ लाखांत खरेदी केले. याशिवाय, ते सध्या राहत असलेल्या ‘मन्नत टू’ बंगल्यावरही त्यांनी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला असल्याचा आरोप खान यांनी केला आहे. यामुळे इम्तियाज जलील यांच्या राजकीय कारकिर्दीतील आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



     

    2 कोटींचे घर अवघ्या 95 लाखांत

    इम्तियाज जलील अनेकांना ब्लॅकमेल करतात. लोकांना भीती घालतात. त्यांना 1 लाख रुपयांचे वेतन मिळते. त्यांनी 2 कोटींचे घर अवघ्या 95 लाखांत घेतले. घरावर 2 कोटी खर्च केले. त्यांनी सिडको प्रशासनावर दबाव टाकून हे घर घेतले होते. अवघा 1 लाख पगार असणाऱ्या जलील यांच्याकडे 3 वर्षांत 3 कोटी रुपये कुठून आले? त्यांच्या घराला केवळ 4 हजारांचा टॅक्स लागतो. पण त्यांना त्याहून अधिक कर लागला पाहिजे, असे अफसर खान म्हणाले. खान यांनी यावेळी इम्तियाज जलील यांनी केलेल्या विविध विकास कामांची चौकशी करण्याचीही मागणी केली.

    संजय शिरसाट जलील यांच्याविरोधात कोर्टात

    दुसरीकडे, मंत्री संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्याविरोधात शेंद्रा औद्योगिक भूखंडासंबंधीच्या आरोपाप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला आहे. त्यावर 24 जून रोजी सुनावणी होणार आहे. शिरसाट यांनी आपल्या दाव्यात म्हटले आहे की, ते राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत. शिवसेनेच्या स्थापनेपासून ते सक्रिय पदाधिकारी आहेत. दोनवेळा नगरसेवक, चौथ्यांदा आमदार पदी निवडून आले आहेत. माजी खा. सय्यद इम्तियाज जलील यांनी 5 जून रोजी पत्रकार परिषदेत शिरसाट यांनी मद्य कारखान्यासाठी पुत्र सिद्धांत यांच्या नावे शेंद्रा एमआयडीसीतील भूखंड घेतला.

    सत्तेचा गैरवापर करीत आरक्षण बदलून त्यांना हा भूखंड घेतल्याचा आरोप केला. याबाबतच्या बातम्या समाज माध्यम आणि दुसऱ्या दिवशी विविध वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्या. वास्तविक या भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात आपण कोणताही पत्रव्यवहार केला नाही. एवढेच नव्हे तर अधिकाऱ्यांना फोन कॉलही केलेही नाही. जलील यांच्या आरोपामुळे आपली प्रतिमा जनमाणसांत मलिन झाली. यामुळे व्यथित झाल्याचे नमूद केले.

    संजय शिरसाट यांनी वकील राजेश रतनलाल काळे यांच्यामार्फत जलील यांच्याविरोधात मुख्य न्यायदंडाधिकारी क्रमांक 3 यांच्या न्यायालयात भारतीय न्याय संहिता कलम356(1),(2),3३) आणि जूना अब्रूनुकसानीचा कायदा कलम 500 नुसार फौजदारी खटला दाखल केला. हा खटला 19 जून रोजी सुनावणीसाठी आला होता. मात्र नियमित न्यायाधीश सुटीवर असल्याने या खटल्याची पुढील सुनावणी 24 जून रोजी ठेवण्यात आली आहे.

    Imtiaz Jaleel Crores Property; Vanchit Bahujan Aghadi Questions

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Jayant Patil पदमुक्त झाल्यावर जयंत पाटलांभोवती घट्ट झाले संशयाचे जाळे; अनेकांना करावे लागताहेत वेगवेगळे खुलासे!!

    Jayant Patil जयंत पाटील पदमुक्त, शशिकांत शिंदेंना पदोन्नती; पण जयंत पाटलांची पावले राष्ट्रवादीतच राहणार, की…??

    Raj Thackeray : जागतिक वारसा स्थळांचा नुसता आनंद साजरा करू नका, जबाबदारीचं भान ठेवा, गडकिल्ल्यांवरची अनधिकृत बांधकाम पाडा!!