• Download App
    विदर्भातील ४ हजार १९९ कोटींच्या ११ प्रकल्पांना सुधारीत प्रशाकीय मान्यता Improved administrative approval for 11 projects worth 4 thousand 199 crores in Vidarbha

    विदर्भातील ४ हजार १९९ कोटींच्या ११ प्रकल्पांना सुधारीत प्रशाकीय मान्यता

    उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची पार पडली बैठक

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची 83 वी बैठक काल सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी विदर्भातील 4199.72 कोटींच्या 11 प्रकल्पांना सुधारीत प्रशाकीय मान्यता देण्यात आली. Improved administrative approval for 11 projects worth 4 thousand 199 crores in Vidarbha

    तत्पूर्वी, महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीतील ठळक मुद्दे –

    -एकूण 73 विषयांना मंजूरी. 240.02 कोटींचे 12 दायित्व प्रस्ताव मंजूर.

    -8 सिंचन प्रकल्प सौर उर्जेवर कार्यान्वित करण्यासाठी 681.68 कोटींचे प्रस्ताव मंजूर.

    -सिंचन प्रकल्पांतर्गत विविध कारणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंमत 3.79 कोटींचे प्रस्ताव मंजूर.

    -प्रकल्पाच्या भूसंपादन निवाड्यामधून सुटलेल्या मालमत्तांची मूल्यांकन रक्कम, फळझाडे व वनझाडांचा मोबदला तसेच पुनर्वसन बाधीत कुटुंबांना मोबदल्यातून सुटलेल्या, मालमत्तांचे मोबदला रक्कम 148.48 कोटी मंजूर. एकुण 5273.69 कोटींचे प्रस्ताव मंजूर.

    Improved administrative approval for 11 projects worth 4 thousand 199 crores in Vidarbha

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    अजितदादांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती फक्त पुणे जिल्ह्यात??, ZP निवडणुकीत भाजपच नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी नंबर 3, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 6 नंबर वर!!

    राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प, फडणवीस विदर्भ आणि तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!

    ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती