• Download App
    ब्राझीलमधून शुद्ध गीर जातीच्या वळूंची आयात दूध उत्पादन वाढण्यास मदत होणार |Imports of pure Gir breed bulls from Brazil It will help increase milk production

    ब्राझीलमधून शुद्ध गीर जातीच्या वळूंची आयात दूध उत्पादन वाढण्यास मदत होणार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यामध्ये महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर यांच्यामार्फत राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ यांच्या सहकार्याने ब्राझीलमधून शुद्ध गीर वंशाचे १० वळू खरेदी करण्यात येणार आहेत. केंद्र शासनामार्फत १००० वीर्यमात्रा व ५० भ्रूणांचा पुरवठा राज्यास केला जाणार आहे. ज्या वळूच्या मातेचे दूध १० हजार किलो प्रतिवेतपेक्षा जास्त आहे,असे गीर वळू आयात करण्यात येणार आहेत. गीर वळूपासून वीर्य रेतमात्रा तयार करून त्याद्वारे राज्यात शुद्ध गीर प्रजातीच्या पैदासीद्वारे राज्यात दूध उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. Imports of pure Gir breed bulls from Brazil It will help increase milk production

    पशुधन ही राष्ट्रीय संपत्ती आहे, पशुधनाची जोपासना ही काळाची गरज आहे. उत्पादनशील पाळीव प्राण्यांचीउत्पादनक्षमता किंवा उपयुक्तता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रजनन (पैदास) पालनपोषण करणे यासाठीपशुसंवर्धन विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. पशुप्रजनन, त्यांचे संगोपन, पोषण आणि रोगराईपासून संरक्षण तसेच स्थानिक समस्या लक्षात घेऊन जास्तीत जास्त शास्त्रीय दृष्टिकोनातून पशुपालन करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे.



    पशुधनवाढीला चालना

    उच्च वंशावळीची निर्मिती : राज्यात शेतकर्‍यांकडील गाई-म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमासाठी लिंग विनिश्चित वीर्यमात्रा वापर करून उच्च आनुवंशिकतेच्या कालवडी/पाड्यांची निर्मिती करण्यात येणार असून, यामध्ये राज्यात आता ९० टक्के उच्च वंशावळीच्या मादी वासरांची निर्मिती होणार आहे. ही वीर्यमात्रा फक्त ८१ रुपयांना उपलब्ध
    करुन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याने घेतला आहे.

    दरम्यान, एव्हीएनएन्फ्लूएन्झा, ब्रुसेलोसिस, रेबीज इत्यादी आणि सीसीएचएफसारख्या उदयोन्मुख व प्राण्यांपासून मानवास होणार्‍या इतर आजारांचे निदान करण्यासाठी ‘बीएसएल’ ची सुविधा आवश्यक आहे.
    म्हणून पुणे येथे टर्नकी बेरिसवरील बायो सेफ्टी लेव्हल -2 आणि बायो सेफ्टी लेव्हल-3 प्रयोगशाळेच्या निर्मितीचा प्रकल्प ‘आरकेव्हीवाय’अंतर्गत हाती घेण्यात आला आहे.

    मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना

    राज्यातील दुर्गम, डोंगर, आदिवासी बहुल भागामध्ये पशुरुग्णांना पशुवैद्यकीय सेवा, पशुपालकांच्या शेतकर्‍यांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी, मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेंतर्गत राज्यातील ३४९ग्रामीण तालुक्यांमध्ये फिरते पशुचिकित्सा पथक स्थापन करण्यात येणार आहे. स्थापन करावयाच्या फिरत्या पशुचिकित्सा पथकांपैकी पहिल्या टप्प्यात ८१ पथके स्थापन करण्याचा निर्णय झाला असून सद्य:स्थितीत क्षेत्रीय स्तरावर ७३ पशुचिकित्सा पथके कार्यरत झालेली आहेत.

    Imports of pure Gir breed bulls from Brazil It will help increase milk production

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!