दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाइन आणि वेळापत्रकानुसारच होतील, असे राज्य परिक्षा मंडळाकडून स्पष्ट केले.Important news for 12th standard students! Maharashtra State Education Corporation has made partial changes in the schedule of 12th examination
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ओमिक्राॅन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला असून दहावी आणि बारावीच्या परिक्षांबाबत संभ्रम निर्माण झाला होता.त्यामुळे दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाइन आणि वेळापत्रकानुसारच होतील, असे राज्य परिक्षा मंडळाकडून स्पष्ट केले.
त्यानंतर शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आल्याचे नमूद केले आहे.या १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन शिक्षण होणार आहे.दरम्यान याच पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या परीक्षा ऑनलाइन होणार का ? अशी शंका उपस्थित होत असतानाच या परीक्षा ऑफलाइनच होणार असल्याचे परिक्षा मंडळाने स्पष्ट केले.
बारावीची परीक्षा ४ मार्च २०२२ ते ३० मार्च २०२२ या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.बारावीच्या परीक्षेतील अर्धमागधी (१६) या विषयाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. अर्धमागधी (१६) विषयाची परीक्षा ७ मार्च २०२२ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० या वेळेत होणार होती.
हा पेपर आता सुधारित वेळेनुसार, ८ मार्च २०२२ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० या वेळेत होणार आहे. वेळापत्रकातील या अंशत: बदलाची सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी तसेच विद्यार्थी, पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे.
Important news for 12th standard students! Maharashtra State Education Corporation has made partial changes in the schedule of 12th examination
महत्त्वाच्या बातम्या
- गोव्यात काँग्रेसने शिवसेनेला झिडकारले; संजय राऊत भाजपच्या “इतिहासात” रमले!!
- BJP Candidates List : यूपी निवडणुकीसाठी भाजपकडून १०७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, मुख्यमंत्री योगी गोरखपूरमधून लढणार, ६३ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी
- अकोला : आरटीओ कार्यालयात महिला अधिकाऱ्यासोबत विनयभंग
- राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस; दरवर्षी १६ जानेवारीला साजरा होणार ;पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा