• Download App
    माढा मतदारसंघात महत्त्वाचा दुष्काळ आणि पाण्याचा मुद्दा; पवार समर्थकांनी लावल्या 11 बुलेटच्या पैजा!!|Important Drought and Water Issue in Madha Constituency; Pawar supporters placed 11 bullet bets!!

    माढा मतदारसंघात महत्त्वाचा दुष्काळ आणि पाण्याचा मुद्दा; पवार समर्थकांनी लावल्या 11 बुलेटच्या पैजा!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : माढा लोकसभा मतदारसंघातले 6 पैकी 4 तालुके दुष्काळी असल्याने तिथे दुष्काळ आणि पाण्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे, पण शरद पवार समर्थक इतके इरेस पेटले आहेत की त्यांनी तुतारी जिंकणार म्हणून 11 बुलेटच्या पैजा लावल्या आहेत.Important Drought and Water Issue in Madha Constituency; Pawar supporters placed 11 bullet bets!!

    माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये पाण्याचा प्रश्न मिटवणार दुष्काळी चालू त्यांना पाणी देणार अशी शपथ पवारांनी ते स्वतः लोकसभा निवडणुकीला उभे राहिले असताना मावळत्या सूर्याच्या साक्षीने घेतली होती. पवारांना माढा मतदारसंघातल्या लोकांनी निवडून दिले पण त्यानंतर अनेक सूर्य उगवले आणि मावळले माढाचे दुष्काळी तालुके तसेच राहिले तिथला दुष्काळ मिटला नाही. पवारांनी पाणी आणले नाही.



    त्यानंतर रणजीत सिंह नाईक निंबाळकर भाजपच्या कमळ चिन्हावर माढा लोकसभा मतदारसंघ शरद पवारांच्या अखंड राष्ट्रवादी काँग्रेस कडून खेचून घेतला त्यांनी माढाच्या दुष्काळी भागांमध्ये पाणी पोहोचवले. कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला गती दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भक्कम साथीने आणि नेतृत्वाखाली रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी माढा मतदारसंघात स्वतःची ताकद निर्माण केली त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत ते कमळ चिन्ह वरच लोकांसमोर गेले परंतु विजयसिंह मोहिते पाटलांनी भाजपची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरली आणि आपला पुतण्या धैर्यशील मोहिते पाटील यांना तुतारी हातात धरायला लावली त्यामुळे आता माढा मतदारसंघात रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटलांची लढत होत आहे. त्यांच्या समर्थकांनी 11 बुलेटच्या पैजा लावल्या आहेत. मोहिते पाटलांची ताकद अकलूज आणि माळशिरस इथे एकवटली आहे पण त्या ताकतीच्या बळावर माढा मतदारसंघ भाजपकडून खेचून घेण्याचे त्यांनी अवतान आणले आहे. माढातले मतदान केव्हाच संपले आहे. त्यानंतर मोहिते पाटलांचे समर्थक आपापली गणिते बसवत आहेत या गणितावर आधारित अनेकांनी पैजा लावल्या आहेत. मोहिते पाटलांचे समर्थक योगेश आणि निलेश या पाटील बंधूंनी 11 बुलेटची पैज लावली आहे ज्याची किंमत तीस लाख रुपये होते आता भाजपमधून अनुप शहा हे स्वीकारायला ते आव्हान स्वीकारायला तयार झाले आहेत ते जितक्या बुलेटच्या पावत्या पडतील तितक्या मी पण फाडायला तयार आहे असे अनुप शहांनी जाहीर केले आहे.

    पण ज्याचा माढा लोकसभा मतदारसंघात 6 पैकी 4 तालुके दुष्काळी आहेत. तिथे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अशा मतदारसंघात पवार समर्थक मात्र 11 बुलेटच्या पैजा लावून आपली ताकद वेगळ्याच ठिकाणी दाखवून देत असल्याची चर्चा आहे.

    Important Drought and Water Issue in Madha Constituency; Pawar supporters placed 11 bullet bets!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस