Thackeray government : राज्यशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा आता 61 हून 62 वर्षे करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील माहिती दिली. important decision of the Thackeray government, the retirement age of health department officials is now 62 years
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा आता 61 हून 62 वर्षे करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
या निर्णयानुसार आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयाअंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ आणि राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ मधील वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ पदावरील अधिकारी यांच्या सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे असणार आहे.
त्याचबरोबर राज्यातील सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतन देण्यासाठी निकषही निश्चित करण्यात आले आहेत. याशिवाय राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता देण्यात आली. तसेच राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावादेखील घेण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची वाढ मंदावलेली असली तरी निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात येणार नाही, असेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे. लसीकरणावर भर देणार असून यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्याला दरमहा 3 कोटी लसींच्या डोसेची मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले. विशेष म्हणजे कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिले आहेत.
important decision of the Thackeray government, the retirement age of health department officials is now 62 years
महत्त्वाच्या बातम्या
- Maratha Reservation : खा. संभाजी छत्रपतींचे मुख्यमंत्र्यांना पत्र, लढा पुन्हा सुरू करण्याचा इशारा
- ममता बॅनर्जी यांचे मुख्यमंत्रीपद जाण्याच्या धास्तीमुळे तृणमूल कॉँग्रेसची निवडणूक आयोगावर टीका
- भाजप युवा मोर्चाची नवी टीम, आमदार राम सातपुते यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी
- आता अंतराळ पर्यटन, व्हर्जीन गॅलक्टिक कंपनीची दररोज अंतराळ भ्रमण सहल काढण्याची योजना
- माजी नागरी विमान वाहतूक मंत्री बनलेत पायलट, खासदार दयानिधी मारन यांनी सांगितली राजीव प्रताप रुडींसोबत एका विमान सफरीची गोष्ट