• Download App
    ओबीसी आरक्षणासाठी इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम आगामी महिन्यांत करणार : वडेट्टीवार । Imperial data collection for OBC reservations will be done next month: Vadettiwar

    ओबीसी आरक्षणासाठी इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम आगामी महिन्यांत करणार – वडेट्टीवार

    वृत्तसंस्था

    मुंबई : ओबीसीशिवाय निवडणुका होऊ नयेत, यासाठी सर्वपक्षीय बैठक घेऊन विधानसभेचा ठराव केला आहे. आता ४ ते ५ महिन्यात इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे काम करु. याकाळात डेटा गोळा करण्याचं काम होईल आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेल अशी १०० टक्के खात्री आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.  Imperial data collection for OBC reservations will be done next month: Vadettiwar
    ओबीसीवरून महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे षडयंत्र होते. पण आता ८ राज्यांमध्ये हा प्रश्न निर्माण झाला आहे.  निवडणुका किमान ६ महिने पुढे ढकलव्यात याचा ठराव करतोय. दरम्यान इम्पिरिकल डाटा गोळा केला जाईल.  केंद्राने अगोदरच हे पाऊल उचलले असते राज्यातील ओबीसींचे आरक्षण वाचले असते.



    ओबीसींना प्रतिनिधित्व नाही : छगन भुजबळ

    मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं की,  ओबीसी संदर्भात भारत सरकारने रिव्ह्यू पिटीशीन दाखल केली आहे. भारत सरकारचं रिव्ह्यू पिटीशनला साथ देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तशी कागदपत्रे देखील केंद्राला देणार आहे. ट्रिपल टेस्ट बाबत चार महिने वेळ द्यावा आणि तोपर्यंत निवडणूका पुढे ढकलाव्यात. देशात ५४ टक्के ओबीसी आहेत. जर आरक्षण गेलं तर ओबीसींना प्रतिनिधित्व राहणार नाही. आम्ही जो आयोग नेमला आहे त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करत आहोत. त्यांना निधी दिला आहे, असं त्यांनी म्हटलं.

    Imperial data collection for OBC reservations will be done next month: Vadettiwar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस