• Download App
    WATCH : अवैध वाळू उपसणाऱ्या १० बोटी केल्या जप्त, पुणे जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्याचा गनिमी कावा । Illegal sand extractors 10 boats confiscated in pune District

    WATCH : अवैध वाळू उपसणाऱ्या १० बोटी केल्या जप्त, पुणे जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्याचा गनिमी कावा

    (Illegal sand extractors) पुणे : अवैध वाळू उपसा करणाऱ्या १० बोटी जप्त करून १ कोटी १५ लाख ५० हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. पाच वाळू माफियांविरोधात पुणे जिल्ह्यातील वाटलुज गावच्या हद्दीत कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस आणि त्यांच्या पथकाने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह ही धडक कारवाई केली.. साध्या वेशात जाऊन वाटलुज गावच्या हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या १० बोटींसह १ कोटी १५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला. भीमा नदीच्या पात्रात सक्शन बोटीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा केला जात होता. वाळू माफियांना दौंड पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. या कारवाईत अवैध वाळू उपसा करणाऱ्या पाच वाळू माफियांविरुद्ध दौंड ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  Illegal sand extractors 10 boats confiscated in pune District

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    राष्ट्रवादीवर पवार कुटुंबीयांचा संपूर्ण कब्जाचा डाव बारगळला; सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत त्याच्या खुणा दिसल्या!!

    Piyush Goyal : भारताची टॉफी निर्यात 12 वर्षांत 166% वाढली; आर्थिक वर्ष 2026 मध्ये ₹132 कोटींवर, मंत्री पीयूष गोयल यांनी डेटा जारी केला

    भारत – सायप्रस यांच्यात संरक्षण, गुंतवणूक, सायबर सुरक्षा आणि व्यापार विकास करार; राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलाइड्स आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या!!