- देशातील तब्बल १ हजार ४३८ शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांचा सहभाग IIT MUMBAI: IIT Mumbai ranks second in the country in Atal rankings;
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अटल रँकिंग इन्स्टिट्यूशन ऑफ इनोव्हेशन अचिव्हमेंट्स या राष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्रातील ७ शैक्षणिक संस्थांनी विविध विभागांमध्ये यश प्राप्त केले आहे. त्यात देशातील महत्त्वपूर्ण केंद्रीय संस्थांच्या (तंत्रशिक्षण) यादीत मुंबईच्या आयआयटी मुंबईने देशात दुसरे तर राज्यात अव्वल येण्याचा मान मिळविला आहे.
देशातील तब्बल १ हजार ४३८ शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांनी देशपातळीवरील या कामगिरीत सहभाग दर्शविला होता. आयआयटी मुंबईने सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेत देशपातळीवर दुसरा क्रमांक मिळविला असून पहिला क्रमांक आयआयटी मद्रासने पटकाविला आहे. सन २०१९ आणि २०२० या वर्षांत सार्वजनिक अनुदानित शैक्षणिक संस्था या विभागात आयआयटी मुंबईला दुसरे स्थान मिळत होते.
तर यंदाच्या अटल रँकिंगमध्ये आयआयटी मुंबईसह, मुंबईच्या व्हीजेटीआय, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे तसेच सिम्बॉयसिस इंटरनॅशनल आणि रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अशा शैक्षणिक संस्थांनी पहिल्या दहामध्ये विविध विभागांत बाजी मारली आहे.
- इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स (तंत्रज्ञान)- आयआयटी मुंबई – देशात दुसरा क्रमांक
- अभिमत विद्यापीठे (तंत्रज्ञान)- इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी – देशात सहावा क्रमांक
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – देशात आठवा क्रमांक
- शासकीय महाविद्यालय / शैक्षणिक संस्था (तंत्रज्ञान)- सिम्बॉयसिस इंटरनॅशनल – देशात १० क्रमांक
- कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे – देशात पहिले
- वीरमाता जीजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट – देशात ५ वा क्रमांक
- जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग – देशात पहिले
IIT MUMBAI : IIT Mumbai ranks second in the country in Atal rankings
महत्त्वाच्या बातम्या
- फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी यांना मरणोपरांत रेडइंक ‘जर्नलिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर ; पत्नी फेड्रिक सिद्दीकीने स्वीकारला पुरस्कार
- CM LETTER TO GOVERNOR : मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्रातील सूर धमकीवजा; राज्यपाल कोश्यारी दुखावले
- काश्मीरमध्ये चकमकीत; जैश-ए-मोहम्मदचे सहा दहशतवादी ठार; दोन ठिकाणी कारवाई