आपले संविधान हे आपल्यासाठी रामराज्य आणण्याचे उपकरण असल्याचेही फडणवीस म्हणाले.
विशेष प्रतिनिधी
नागपूर : Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे आयोजित श्रीराम अध्यात्म मंदिर, रामनगर येथे ‘पश्चिम नागपूर शोभायात्रा’ मध्ये उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित रामभक्तांना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्याशी संवाद साधला.Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी प्रभू श्रीरामांनी आपल्याला उच्च जीवनमूल्ये शिकवल्याचे व नैतिक मर्यादांची जाणीव करून दिल्याचे अधोरेखित केले. रामराज्य म्हणजे भेदभाव विरहित, सत्याचा विचार करणारे आणि प्रत्येक व्यक्तिला अधिकार देणारे राज्य असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. आपल्यातील राम आपण जाणला तर असुरी शक्तींचा विनाश करता येऊ शकतो हा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोभायात्रेतील संविधानाच्या देखाव्याचे कौतुक केले व आपले संविधान हे आपल्यासाठी रामराज्य आणण्याचे उपकरण असल्याचे अधोरेखित केले.
यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, शोभायात्रा अध्यक्षा शिवानी दाणी-वखरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.